scorecardresearch

Facebook वरील ‘या’ मेसेजवर चुकूनही क्लिक करू नका; बँक खाते होऊ शकते रिकामी

फेसबुकवर येणार्‍या या मेसेजवर प्रतिक्रिया देऊ नका नाहीतर तुम्ही आर्थिक फसवणुकीला बळी पडू शकता.

facebook-messenger-scam-2022
तुमची माहिती आणि बँक तपशील मिळवण्याचा हॅकर्सचा हा एक मार्ग आहे. (प्रातिनिधिक फोटो)

आपल्यापैकी खूप कमी लोक असतील जे आपल्या स्मार्टफोनवर सोशल मीडियाचा वापर करत नाहीत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मबद्दल बोलायचे तर, फेसबुक हे एक व्यासपीठ आहे जे बहुतेक लोक वापरतात. तुम्हीही फेसबुक यूजर असाल तर सावध व्हा कारण एका छोट्याशा चुकीने तुम्हाला तुमचे सर्व पैसे गमवावे लागू शकतात. फेसबुकवर येणार्‍या या मेसेजवर प्रतिक्रिया देऊ नका नाहीतर तुम्ही आर्थिक फसवणुकीला बळी पडू शकता.

अलीकडे, लोकांची सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवणूक करण्यात येत आहे, ज्यामध्ये तुम्हाला फेसबुक मेसेंजरवर एक धोकादायक संदेश पाठवला जात आहे. गेल्या काही दिवसांत, अनेक युजर्सना त्यांच्या स्वतःच्या फेसबुक मित्रांकडून फेसबुक मेसेंजरवर एक संदेश येत आहे ज्यामध्ये एक लिंक आणि त्याच्या सोबत ‘तुम्ही या व्हिडीओमध्ये आहात का? असा मजकूर येत आहे. हा मेसेज एक अतिशय धोकादायक स्कॅम आहे

.Google Maps चालणार इंटरनेटशिवाय; जाणून घ्या, नकाशे ऑफलाइन डाउनलोड करण्याची सोपी पद्धत

Photo Credit: Naked Security – Sophos

तुमच्या स्मार्टफोनचा स्फोट होण्याची भीती वाटतेय? मग ‘या’ टिप्स वाचाच

हा संदेश मिळाल्यावर, युजर्स लिंकवर क्लिक करून स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करतात. या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा फेसबुक आयडी आणि पासवर्ड टाकावा लागतो. वास्तविक, या लिंकवर जाऊन, तुम्हाला तुमचा कोणताही व्हिडीओ मिळणार नाही, परंतु अशा प्रकारे तुमच्या फेसबुक खात्याचा तपशील घेणे आणि नंतर त्याद्वारे तुमची माहिती आणि बँक तपशील मिळवण्याचा हॅकर्सचा हा एक मार्ग आहे. तुमच्या अकाऊंटवरून मेसेज तुमच्या इतर फेसबुक फ्रेंड्सना गेला असेल हे तुम्हाला माहितही नसेल.

कोणत्याही URL वर क्लिक करण्यापूर्वी, ते HTTPS किंवा HTTP ने सुरू होत आहे का ते तपासा. जर असे होत नसेल तर याचा अर्थ ही लिंक बनावट असू शकते.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dont click on this message on facebook bank account will be empty pvp

ताज्या बातम्या