दिवाळी सण आला की, लोकं फटाके फोडतात. यात काहींचं समाधान होत नाही. अशात ते काहीतरी मोठं करण्याची शक्कल लढवतात. गुगल, यु-टयूब पाहून किंवा सोशल साइड्सचा वापर करून काहीतरी अतरंगी करण्याचा प्रयत्न करतात. तर काही माथेफिरू मोठा आवाज करण्यासाठी चक्क बॉम्ब बनविण्याचा विचार करतात. मात्र, आजच सावध व्हा! जर आपणही असा विचार करत असाल तर आपल्याला तुरूंगवास होऊ शकतो.

‘हे’ कंटेंट शोधणे टाळा

सोशल मिडीया हा ज्ञानाचा भंडार आहे. मात्र, हेच माध्यम आपल्यासाठी विध्वंसक देखील आहे. ते आपल्या वापरावर अवलंबून आहे. आपण जर बॉम्ब किंवा गनपावडर बनवण्याच्या पद्धतीबद्दल माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला अडचणींना सामोरे जावे लागू शकते, कारण भारत सरकार अशा शोधांवर लक्ष ठेवते. चूकूनही अशी माहिती शोधाच्या खोलात गेलात तर देशाच्या सुरक्षेला डोळ्यासमोर ठेवून पोलिस आपल्याला फॉलो करून आपल्यावर बारिक लक्ष ठेवतात. असं कृत्य आपल्यासाठी अतिशय घातक ठरू शकते.

आणखी वाचा : पीएफ खात्याचा पासवर्ड विसरलात? काळजी करू नका! पासवर्ड रिसेट करण्यासाठी जाणून घ्या ‘या’ सोप्या टिप्स…

हे देखील महत्वाचे!

बाल गुन्हेगारी संबंधीत माहिती शोधू नये

जर तुम्हाला गुगल सर्चवर किवा यु-टयूबवर बालगुन्हेगारीशी संबंधित कोणतीही माहिती मिळवायची असेल तर तुम्ही तसे करणे टाळा. कारण बालगुन्हेगारीबाबत अतिशय कडक नियम आहेत आणि जर तुम्हाला या विषयाशी संबंधित माहिती वारंवार मिळत असेल तर तुम्हाला तुरुंगात जावे लागू शकते.

मोबाईल हॅकिंगबद्दल सर्च करू नये

आजकाल बहुतेक लोकांना हॅकिंगबद्दल जाणून घ्यायचे असते. चूकीच्या पध्दतीनं सर्व काही माहिती करून घेण्यासाठी हॅकरची मानसिकता असते. काहीतरी मोठं मिळविण्याच्या उद्देशानं हॅकिंगचा वापर अनेक जण करतात. गुगल सर्चवर हॅकिंग विषयाशी संबंधित माहिती मिळत राहते, पण तुम्हाला माहिती आहे का की, तुम्ही असे वारंवार केल्यास सरकार तुमच्यावर कारवाई करू शकते. त्यामुळे हॅकिंगसारख्या संवेदनशील विषयावर माहिती मिळवण्याचा प्रयत्न न केलेलाच बरा. नाहीतर पोलिसांचा सामना तुम्हाला करावा लागेल आणि तुरूंगवास भोगावे लागेल.