कर्नाटक विधानसभेची निवडणूक १० मे रोजी होत आहे. कर्नाटक विधानसभेची एकूण सदस्यसंख्या २२४ आहे. त्यासाठी होणाऱ्या मतदान प्रक्रियेमध्ये एकूण ५ कोटी १ लाख मतदार सहभागी होतील, अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होणाऱ्या ८०हून जास्त वयाच्या मतदारांची संख्या तब्बल १२.१५ लाख इतकी आहे. या निवडणुकीत ९ लाख १७ हजार नवमतदार मतदान करणार आहेत. अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली. कर्नाटकमध्ये १० मे रोजी मतदान होणार असून मतमोजणी आणि निकाल १३ मे रोजी लागणार आहे.कर्नाटकमध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी निवडणूक आयोग फेशियल रिकॉग्निशन सिस्टीमचा वापर करणार आहे. ज्या अंतर्गत मतदार अधिकृत अ‍ॅपमध्ये सेल्फी अपलोड करतील आणि त्यानंतर मतदान करू शकतील. याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

कर्नाटकमधील निवडणुकांमध्ये निवडणूक आयोग फेशियल रिकॉग्निशन सिस्टीमचा वापर करणार आहे. ही टेक्नॉलॉजी बंगळुरूमधील एका पोलिंग बूथवर वापरण्यात येणार आहे. याच्या मदतीने मतदार रांगेत न थांबता पटकन मतदान करू शकतात. फेशियल रिकॉग्निशन सिस्टीम म्हणजे काय आणि ती कशी काम करते असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर त्याबद्दल माहिती जाणून घेऊयात. खरे तर निवडणुकीची प्रक्रिया अधिक सोपी करण्यासाठी निवडणूक आयोगाने फेशियल रिकॉग्निशन सिस्टीम सुरू केली आहे. याच्या मदतीने मतदान करणे खूप सोपे होते आणि मतदाराना लांब रांगेत उभे राहावे लागत नाही.

Man wraps utensils in plastic to avoid washing them.
भांडी घासावी लागू नये व्यक्तीने शोधला भन्नाट जुगाड! हर्ष गोयंकांनी शेअर केला मजेशीर व्हिडीओ
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Money Mantra, insurance, tax saving, investments
Money Mantra: कर बचतीसाठी केलेल्या गुंतवणुकीत विम्याचे काही चांगले पर्याय आहेत का?
How To Identify Mangoes Without Adulteration Five Signs
गोड, रसाळ आंबा निवडताना ‘या’ खुणांकडे असू द्या नजर; तज्ज्ञांनी सांगितली भेसळ ओळखण्याची योग्य पद्धत

हेही वाचा : Food Delivery Apps: Swiggy आणि Zomato पेक्षा ‘या’ प्लॅटफॉर्मवर खाद्यपदार्थ मिळतायत स्वस्त; जाणून घ्या कसे करायचे ऑर्डर

असे करते काम

फेशियल रिकॉग्निशन सिस्टीमच्या मदतीने मतदान करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने Chunavana App लॉन्च केले आहे. ही App तुम्ही प्ले-स्टोअरवर जाऊन डाउनलोड करू शकता. या अ‍ॅपपमध्ये प्रथम मतदारांना त्यांचे डिटेल्स आणि फोटो अपलोड करावे लागणार आहेत. डिटेल्स अपलोड केल्यावर मतदार मतदान केंद्रावर त्यांच्या फेस व्हेरीफीकेशन करून थेट मतदान करू शकतात.

फक्त याच बूथवर मिळणार सुविधा

कर्नाटक राज्यातील मुख्य निवडणूक कार्यालयाजवळ असलेल्या सरकारी चेल्लाराम कॉलेज, पॅलेस रोड बंगळुरूमधील रूम नंबर – २ मध्ये निवडणूक आयोग फेशियल रिकॉग्निशन सिस्टीम स्थापित करणार आहे. या सिस्टीम प्रणालीअंतर्गत मतदाराला त्याचे फेस व्हेरीफीकेशन करावे लागेल. त्यानंतर तो ठेतपणे मतदान करू शकतो. App वर फोटो अपलोड करताना तो स्वच्छ म्हणजेच कसलाही डाग नसलेला फोटो अपलोड करावा. म्हणजे मतदान केंद्रावर तुमचे व्हेरीफीकेशन सहजपणे होऊ शकेल.

हेही वाचा : Reliance Jio आणि Airtel ५०० रुपयांमध्ये पोस्टपेड प्लॅन्स, जाणून घ्या कॉलिंग, इंटरनेटसाठी कोणता आहे बेस्ट

Chunavana App च्या माध्यमातून मतदार सहजपणे मतदान करू शकतात. त्याशिवाय मतदानाशी संबंधित जसे की, मतदानाची वेळ, मतदान केंद्रातील पार्किंगची जागा, जवळपासचे पोलिस स्टेशन आणि हॉस्पिटल्सची माहिती पाहू शकणार आहेत. याशिवाय ज्येष्ठ नागरिक किंवा दिव्यांग व्यक्ती या अ‍ॅपद्वारे व्हील चेअरसाठी विनंती करू शकतात.