Electric Heater Vs Oil Heater: हिवाळ्यात गरम कपडे, रूम हीटर घेण्याची लगबग सुरू होते. तुम्हाला उबदार हवेचा अनुभव घ्यायचा असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे. कारण, आता बाजारात अनेक उत्तम प्रकारचे रूम हीटर आले आहेत. बाजारात दोन प्रकारचे हीटर्स उपलब्ध आहेत, एक ऑइल हिटर आणि दुसरे इलेक्ट्रिक हीटर. या दोन हीटर्समध्ये खूप फरक आहे आणि दोन्हीचे काही फायदे आणि तोटे आहेत, ज्याबद्दल आम्ही तुम्हाला येथे सांगत आहोत. चला तर मग जाणून घेऊयात, इलेक्ट्रिक हीटर चांगला की ऑईल हीटर चांगला?

इलेक्ट्रिक हीटर आणि ऑईल हीटर या दोन्हींचे काही फायदे आणि काही तोटे आहेत.

Jio Removed Three Value Recharge Plans With Limited Data See more Details
अरेरे यार हे काय झालं?? जिओने ‘हे’ ३ प्लॅन्स केले बंद; दरवाढीनंतर जिओचा युजर्सना आणखी एक धक्का
Republic Day Sale Realme GT 6 Get massive discount
Republic Day Sale : रिअलमीच्या ‘या’ स्मार्टफोनवर बंपर…
Airtel Voice and sms prepaid Recharge plan price benefits in marathi
Airtel चा धमाका, ग्राहकांसाठी फक्त कॉलिंग अन् SMS साठी आणले २ जबरदस्त रिचार्ज प्लॅन; जाणून घ्या किंमत…
Airtel affordable recharge plan
Airtel Affordable Recharge: वर्षभर रिचार्ज करण्याचे टेन्शन दूर; मोफत मिळेल डिस्नी प्लस, आणि हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन, जाणून घ्या एअरटेलच्या ‘या’ खास प्लॅन्सबद्दल
Add Music to your WhatsApp Status
WhatsApp Upcoming Feature: स्टेटस, लाईकनंतर आता व्हॉट्‌सॲपमध्ये जोडलं जाणार इन्स्टाग्रामचे ‘हे’ फीचर; फोटो, व्हिडीओला बनवेल आणखीन आकर्षक
new SIM Card Rule For Customers
New SIM Card Rule: नवीन वर्षात बदलतेय सिम कार्ड घेण्याची पद्धत; आता फॉर्म भरण्याबरोबर ‘ही’ गोष्ट करणे ठरणार बंधनकारक
Mahakumbh 2025 App
Mahakumbh 2025 App डाऊनलोड करा अन् संपूर्ण प्रयागराजमध्ये फिरा! हॉटेल-लॉज, ट्रेन-बस आणि आपात्कालीन सेवांचा नंबर; सर्व माहिती फक्त एका क्लिकवर….
poco x7 pro and poco x7 launched in india
Poco X7 Series: बजेट फ्रेंडली आणि पॉवर परफॉर्मन्स असलेले पोकोचे दोन फोन लाँच; किंमता आणि फिचर्स जाणून घ्या
WhatsApp New Feature for meta AI
WhatsApp New Feature: व्हॉट्सअ‍ॅपचे ‘हे’ नवीन फीचर पाहिलंत का? मदत मागणं होईल सोपं, पाहा कसा होईल फायदा

ऑइल हिटर फायदे

ऑइल हिटर हे तेलावर चालत नाही, उलट हीटरच्या ग्रीलमध्ये भरलेले तेल विजेने गरम केले जाते आणि गरम केल्यानंतर ते खोलीचे तापमान तापवते. ऑइल हिटरचे रेडिएटर गरम झाल्यावर ते वीज पुरवठा घेणे थांबवते.ऑइल हीटर्स इलेक्ट्रिक हीटर्सपेक्षा कमी वीज वापरतात. इलेक्ट्रिक हीटरला चालण्यासाठी सतत वीज लागते, तर ऑइल हिटरचा रेडिएटर गरम केल्यानंतर वीज कमी करतो, ज्यामुळे तुमच्या विजेचा वापर कमी होतो. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून ऑइल हिटर देखील सर्वोत्तम मानले जातात, कारण तो कमी वीज वापरतो त्यामुळे कमी कार्बन फूटप्रिंट निर्माण करतात आणि ते पर्यावरणाचे रक्षण करण्यास उपयुक्त ठरतात. ऑइल हिटर वापरताना कोणत्याही प्रकारचा आवाज येत नाही, त्यामुळे ते वापरताना एकाग्रता बिघडत नाही. आणि रात्री चालू करुन तुम्ही आरामात झोपू शकता.

ऑइल हिटर तोटे

तोट्यांबद्दल बोलायचे झाले तर ऑईल हीटर खरेदी करण्यासाठी सामान्य हिटरपेक्षा जास्त पैसे खर्च करावे लागतात. आपल्यासाठी कोणता हीटर चांगला आहे हे आपल्या घराच्या आकार, बजेट आणि गरजा यावर अवलंबून असते.

हेही वाचा >> Jio New Recharge: वाहह! फक्त इतक्या रुपयांमध्ये मिळणार वर्षभरासाठी अनलिमिटेड 5G डेटा; पाहा जबरदस्त रिचार्ज प्लॅन

इलेक्ट्रिक रूम हीटरचे फायदे

त्वरित गरम करणे: कॉइल धातू किंवा सिरॅमिकचे बनलेले असल्याने, इलेक्ट्रिक रूम हीटर्स लगेच गरम होते आणि खोलीत उष्णता पसरवते. याव्यतिरिक्त नॉर्मल हीटर सामान्यत: ऑईल हीटरपेक्षा स्वस्त असतात. इलेक्ट्रिक हीटरचा आकार लहान असून हे हीटर हलके असतात, जे सहज पणे इकडे तिकडे हलवता येतात.

इलेक्ट्रिक रूम हीटरचे तोटे

तोट्यांबद्दल बोलायचे झाले तर इलेक्ट्रिक हीटर जास्त वीज वापरते. चला तर मग जाणून घेऊया हे हीटर कसे काम करते? या प्रकारच्या हीटरमध्ये ब्लोअर आणि स्प्रिंगचा वापर केला जातो, जे गरम होऊन गरम हवा देतात. नॉर्मल हीटरमुळे त्वचा कोरडी पडू लागते, ज्यामुळे त्वचा फुटते. अशा वेळी नॉर्मल हीटरपेक्षा जास्त काम करण्यास मनाई आहे.

Story img Loader