Elon Musk Shares Meme on Brazil Ban X : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, तसेच स्पेसएक्स व टेस्ला या कंपन्यांचे मालक एलॉन मस्क हे समाजमाध्यमांवर खूप सक्रीय असतात. बऱ्याचदा ते एक्स या त्यांच्या मालकीच्या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर गंमतीशीर पोस्ट करत असतात, मीम्स शेअर करत असतात. दरम्यान, ब्राझीलमध्ये एक्सवर घातलेल्या बंदीवरून मस्क यांनी एक गंमतीशीर मीम एक्सवर शेअर केलं. मात्र या मीममधील एका चुकीमुळे मस्क ट्रोल होऊ लागले आहेत. कारण त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये एक्स ऐवजी ट्विटर असं म्हटलं आहे. काही महिन्यांपूर्वी मस्क यांनी ट्विटर हा मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म खरेदी केला. त्यानंतर कंपनीत त्यांनी अनेक बदल केले. ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी थेट कंपनीचं नाव व लोगो बदलला आणि आता त्यांनी त्यांच्या कंपनीचा जुन्या नावाने उल्लेख केल्यामुळे ते ट्रोल होऊ लागले आहेत.

मस्क यांनी एक्सचं रिब्रँडिंग केलं, मोठा प्रचार केला. तरीदेखील अनेक युजर्स व स्वतः मस्क हे देखील एक्सचा ट्विटर असा उल्लेख करत आहेत हे पाहुन कंपनीच्या वाटचालीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एलॉन मस्क यांनी केलेल्या पोस्टमधून दिसतंय की त्यांनी त्यांच्या कंपनीचं नाव बदलल्याचं ते स्वतःच विसरून गेले आहेत. कारण मस्क यांनी त्यांच्या पोस्टमध्ये एक्सऐवजी ट्विटर असा शब्द वापरला आहे.

हे ही वाचा >> Facebook Logo : फेसबूकने लोगो अचानक का बदलला? मेटानं दिलं स्पष्टीकरण! ॲप अपडेट करण्याचं सर्वांना आवाहन, नेमकं कारण काय?

मस्क यांनी शेअर केलेल्या मीमच्या अर्थ काय?

ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाने ब्राझीलमध्ये एक्सवर बदी घातली आहे. न्यायमूर्ती मॉरिस यांनी शुक्रवारी (३० ऑगस्ट) यासंदर्भात निकाल दिला. लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणि चुकीच्या माहितीचा प्रसार केल्याचा एक्सवर आरोप आहे. चार ते पाच महिने ब्राझीलच्या न्यायालयात याप्रकरणी खटला चालू होता. अखेर गेल्या आठवड्यात ब्राझीलच्या न्यायालयाने ब्राझीलमधील एक्सची सर्व्हिस सस्पेंड केली. मात्र, ब्राझीलमधील काही युजर्स अजूनही व्हीपीएनच्या मदतीने एक्स वापरत असल्याचा दावा केला जात आहे. स्वतः मस्क यांनी देखील त्याला दुजोरा दिला आहे. यावरूनच मस्क यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे.

हे ही वाचा >> इंटरनेटच्या जगातील आजवरचे सर्वात मोठे स्थलांतर! Tumblr अ‍ॅप करणार युजर्सचे ब्लॉग… वाचा नक्की काय होणार बदल

मस्क यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये एक फोटो आहे. ज्यामध्ये एक लठ्ठ माणूस कोट्यवधी डॉलर्स जमिनीवर अंथरून त्यावर झोपला आहे. मस्क यांनी त्या माणसाला व्हीपीएन कंपनीचे मालक असं संबोधलं आहे. मस्क यांच्या मते ब्राझीलमध्ये एक्सवर बंदी घातल्याचा व्हीपीएन सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना मोठा आर्थिक फायदा होऊ लागला आहे.