ट्विटरने गुरुवारी इलॉन मस्क यांचे मित्र प्रणय पाठोळे या २४ वर्षीय आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या युजरचे ट्विटर खाते निलंबित केले. पाठोळे याची २०१८ पासून इलॉन मस्क यांच्याशी मैत्री आहे. ट्विटरचे नियम मोडल्यामुळे ही कारवाई झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या वर्षी ऑगस्ट महिन्यात ट्विटरचे सीईओ मस्क आणि पाठोळे यांच्यात टेक्सास येथील गिगाफॅक्टोरीमध्ये भेट झाली होती. मस्क यांना प्रत्यक्ष भेटून खूप आनंद झाला, अशी भावना पाठोळे याने त्यावेळी व्यक्त केली होती.

(‘INFINIX’ने लाँच केला सर्वात स्वस्त 5G फोन, किंमत १२ हजारांच्या आत, फोनमध्ये ५० एमपी कॅमेरा)

इलॉन मस्क तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. एवढा नम्र व्यक्ती मी कधीच पाहिला नाही. तुम्ही लाखो लोकांसाठी प्रेरणा आहात, अशी भावना प्रणयने मस्क यांच्याशी भेट झाल्यानंतर व्यक्त केली होती. पाठोळे हा टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेससाठी सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करतो. मस्क आणि पाठोळे २०१८ पासून ट्विटरवर मित्र आहेत.

ट्विटरची बनावट खात्यांवर कारवाई

बनावट खात्यांमुळे इलॉन मस्क यांनी ट्विटरची ब्ल्यू टीक सेवा स्थगित केली होती. आता या खात्यांवर कारवाई होत असल्याचे मस्क यांनी आज केलेल्या ट्विटमधून समजते आहे. मस्क यांनी आज सकाळी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली. त्यात ट्विटर सध्या बरीच स्पॅम खाती हटवत आहे, यामुळे तुमच्या फॉलोवर्सच्या संख्येमध्ये तुम्हाला घट दिसू शकते, असे त्यांनी लिहिले आहे.

ट्विटरमध्ये गोंधळाची परिस्थिती

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मस्क यांनी ट्विटरची मालकी मिळवल्यानंतर कंपनीमध्ये अनेक फेरबदल केले. ट्विटरचे सीईओ पराग अगरवालसह काही उच्च अधिकाऱ्यांना त्यांनी कामावरून काढल्यानंतर कंपनीतील जवळपास ५० टक्के कर्मचाऱ्यांना बेरोजगार केले. त्यानंतर शुल्कासह ब्ल्यू टीक सेवा सुरू केली. याचा दुरुपयोग होत असल्याचे पाहून ती सेवा स्थगित करण्यात आली. यानंतरही कंपनीत गोंधळ सुरूच आहे. या सर्व घटनांमुळे युजर संतापून आहे.

(‘WHATSAPP’ची मोठी कारवाई, भारतातील २३.२४ लाख खाती बंद केली)

५४ लाख TWITTER युजर्सचा डेटा लीक

अलीकडेच ५० कोटी व्हॉट्सअ‍ॅप युजर्सचा डेटा लीक झाल्याची माहिती समोर आल्यानंतर आता ५४ लाख ट्विटर युजर्सचा डेटा देखील लीक झाल्याचे समोर आले आहे. लीक झालेल्या डेटामध्ये सार्वजनिक माहिती, खाजगी फोन नंबर आणि ईमेल आयडीचा समावेश आहे.

कोड प्रभावित झाल्याने डेटा उघड झाल्याची कबुली ट्विटरने या वर्षी जुलै महिन्यात दिली होती. मात्र नंतर डेटाचा गैरवापर करण्यात आला की नाही, याबाबत माहिती नसल्याचे ट्विटरकडून सांगण्यात आले होते. परंतु, आता ब्लिपिंग कंम्प्युटरच्या अहवालानुसार, ५४ लाख ट्विटर युजर्सचा डेटा हॅकर फॉरमवर मोफत शेअर करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Elon musk friend pranay pathole twitter account suspended ssb
First published on: 02-12-2022 at 12:33 IST