elon musk tweet on spam account says you may see your follower count drop | Loksatta

“…त्यामुळे तुमचे Twitter फॉलोअर्स कमी होऊ शकतात”, एलॉन मस्क यांचं सूचक ट्वीट; नेटिझन्समध्ये चर्चेला उधाण!

बनावट खात्यांमुळे इलॉन मस्क यांनी ट्विटरची ब्ल्यू टीक सेवा स्थगित केली होती. आता या खात्यांवर कारवाई होत असल्याचे मस्क यांनी आज केलेल्या ट्विटमधून समजते आहे.

“…त्यामुळे तुमचे Twitter फॉलोअर्स कमी होऊ शकतात”, एलॉन मस्क यांचं सूचक ट्वीट; नेटिझन्समध्ये चर्चेला उधाण!
(संग्रहित छायाचित्र)

बनावट खात्यांमुळे इलॉन मस्क यांनी ट्विटरची ब्ल्यू टीक सेवा स्थगित केली होती. आता या खात्यांवर कारवाई होत असल्याचे मस्क यांनी आज केलेल्या ट्विटमधून समजते आहे. मस्क यांनी आज सकाळी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली. त्यात ट्विटर सध्या बरीच स्पॅम खाती हटवत आहे, यामुळे तुमच्या फॉलोवर्सच्या संख्येमध्ये तुम्हाला घट दिसू शकते, असे त्यांनी लिहिले आहे.

नेटकरी म्हणाले

यावर नेटकऱ्यांनीही मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. असे करू नका, मला केवळ हीच खाती फॉलो करतात, असे एका युजरने लिहिले. तर याबाबत कोणी अगोदर इशारा दिला नाही, अशी थट्टा एकाने केली, तर तुम्ही ट्विटरला नष्ट करत आहात, अशी भावना एका युजरने व्यक्त केली. असे असेल तर जो बिडेन यांच्या फॉलोवर्सची संख्या ९५ टक्के कमी झाली पाहिजे, असे मत एका युजरने व्यक्त केले.

(नेटफ्लिक्सच्या सह संस्थापकाने मस्क यांच्यासाठी काढले गौरोद्गार, ते धाडसी आणि सर्जनशील, पण त्यांना..)

ट्विटरमध्ये गोंधळाची परिस्थिती

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मस्क यांनी ट्विटरची मालकी मिळवल्यानंतर कंपनीमध्ये अनेक फेरबदल केले. ट्विटरचे सीईओ पराग अगरवालसह काही उच्च अधिकाऱ्यांना त्यांनी कामावरून काढल्यानंतर कंपनीतील जवळपास ५० टक्के कर्मचाऱ्यांना बेरोजगार केले. त्यानंतर शुल्कासह ब्ल्यू टीक सेवा सुरू केली. याचा दुरुपयोग होत असल्याचे पाहून ती सेवा स्थगित करण्यात आली. यानंतरही कंपनीत गोंधळ सुरूच आहे. या सर्व घटनांमुळे युजर संतापून आहे.

५४ लाख TWITTER युजर्सचा डेटा लीक

अलीकडेच ५० कोटी व्हॉट्सअ‍ॅप युजर्सचा डेटा लीक झाल्याची माहिती समोर आल्यानंतर आता ५४ लाख ट्विटर युजर्सचा डेटा देखील लीक झाल्याचे समोर आले आहे. लीक झालेल्या डेटामध्ये सार्वजनिक माहिती, खाजगी फोन नंबर आणि ईमेल आयडीचा समावेश आहे.

(Bluebugging: ब्लूटूथ सुरू ठेवणे पडू शकते महागात, डेटा होऊ शकतो चोरी)

कोड प्रभावित झाल्याने डेटा उघड झाल्याची कबुली ट्विटरने या वर्षी जुलै महिन्यात दिली होती. मात्र नंतर डेटाचा गैरवापर करण्यात आला की नाही, याबाबत माहिती नसल्याचे ट्विटरकडून सांगण्यात आले होते. परंतु, आता ब्लिपिंग कंम्प्युटरच्या अहवालानुसार, ५४ लाख ट्विटर युजर्सचा डेटा हॅकर फॉरमवर मोफत शेअर करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 11:12 IST
Next Story
नेटफ्लिक्सच्या सह संस्थापकाने मस्क यांच्यासाठी काढले गौरोद्गार, ते धाडसी आणि सर्जनशील, पण त्यांना..