फेसबूक आणि इन्स्टाग्राम हे मेटा अंतर्गत येणारे लोकप्रिय सोशल मीडिया ॲप्स आहेत. या दोन्ही ॲप्सवर अनेक चांगल्या वाईट गोष्टी शेअर केल्या जातात. कधीकधी त्याचा हेतू केवळ मनोरंजन असतो तर कधी एखाद्या विशिष्ट समाजाबद्दल, धर्माबद्दल द्वेष निर्माण करणे. अशाच द्वेष पसरवणाऱ्या कंटेट विरोधात मेटाकडून नेहमी कारवाई केली जाते. याचेच उदाहरण म्हणजे जुलै महिन्यात फेसबूक आणि इन्स्टाग्राम या दोन्ही ॲप्सवरून २.७ कोटी पोस्ट डिलीट करण्यात आल्या आहेत.
फेसबूक आणि इन्स्टाग्रामने आयटी अॅक्ट २०२१ अंतर्गत ही कारवाई केली आहे. मेटाकडून १.७३ कोटी स्पॅम पोस्ट, २.३ हिंसक पोस्ट आणि ग्राफिक्स कंटेन्ट डिलीट करण्यात आला.




आणखी वाचा – फक्त ४२ रुपयांमध्ये डेटासह कॉलिंगची सुविधा! बीएसएनएलचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन जाणून घ्या
मेटाकडून जाहीर झालेल्या माहितीनुसार आत्महत्येला प्रवृत्त करणारे, हिंसक विचारांना खतपाणी घालणाऱ्या पोस्ट डिलीट करण्यात आल्या आहेत. याशिवाय न्यूड फोटोशूट, सेक्सश्युल कंटेन्ट देखील फेसबूक, इन्स्टाग्रामवरून डिलीट करण्यात आला आहे. याबाबत वापरकर्त्यांकडून तक्रारी पाठवण्यात आल्याचे मेटाने स्पष्ट केले. सर्व तक्रारींवर कारवाई करत द्वेष पसरवणारा, तसेच अयोग्य कंटेन्ट डिलीट करण्यात आला आहे.