एकाच प्लॅटफॉर्मवर वापरता येणार फेसबूक व इन्स्टाग्राम; काय आहे मेटाचे नवे फीचर जाणून घ्या | Facebook and Instagram will be available on same platform know more about this new feature of Meta | Loksatta

एकाच प्लॅटफॉर्मवर वापरता येणार फेसबूक व इन्स्टाग्राम; काय आहे मेटाचे नवे फीचर जाणून घ्या

मेटाद्वारे लवकरच एक नवे फीचर लाँच करण्यात येणार आहे, ज्याद्वारे फेसबूक आणि इन्स्टाग्राम एकाच प्लॅटफॉर्मवर वापरता येतील.

एकाच प्लॅटफॉर्मवर वापरता येणार फेसबूक व इन्स्टाग्राम; काय आहे मेटाचे नवे फीचर जाणून घ्या
संग्रहित छायाचित्र

फेसबूक आणि इन्स्टाग्राम हे मेटाचे लोकप्रिय प्लॅटफॉर्म्स आहेत. जगभरात या दोन्ही प्लॅटफॉर्म्सचे असंख्य युजर्स आहेत. मेटाकडुन युजर्सना अधिक आकर्षित करण्यासाठी सतत नवनवे फीचर्स लाँच केले जातात. या नव्या फीचर्स मधून युजर्सचा वापर आणखी वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. असेच एक नवे फीचर मेटाकडून लवकरच लाँच करण्यात येणार आहे. या नव्या फीचरमुळे इन्स्टाग्राम आणि फेसबूक एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार आहे.

कंपनीकडून या नव्या फीचरबद्दल माहिती देण्यात आली. सध्या या नव्या फीचरवर काम सुरू असल्याचे कंपनीने सांगितले. काय असणार आहे हे नवे फीचर जाणून घ्या.

आणखी वाचा : ड्युअल सिममध्ये एअरटेलचे कार्ड वापरताय? फक्त नंबर चालू ठेवायचा असेल तर सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन कोणते जाणून घ्या

फेसबूक आणि इन्स्टाग्राम अकाउंटमध्ये करता येणार स्विच

  • या नव्या फीचरमुळे इन्स्टाग्राम आणि फेसबूक अकाउंटमध्ये स्विच करता येणार आहे.
  • यासाठी युजर्सना दोन्ही अकाउंट एकमेकांना लिंक करावे लागतील. अकाउंट लिंक झाल्यानंतर युजर्स सहजरित्या दोन्ही अकाउंट स्विच करून वापरू शकतील.
  • यामध्ये युजर्सना एकावेळी दोन्ही अकाउंटचे नोटिफिकेशन मिळतील. एकापेक्षा जास्त अकाउंट असणाऱ्यांना देखील हे वापरता येईल.

या फीचरसह मेटाने युजर्स रेजिस्ट्रेशन प्रोसेसला पण मॉडीफाय केले आहे. त्यामुळे युजर्सना लॉग इन करणे किंवा नवीन अकाउंट सुरू करणे अधिक सोप्पे झाले आहे. म्हणजे या नव्या फीचरमुळे एखाद्या व्यक्तीचे फक्त फेसबूकवर अकाउंट असेल तर इन्स्टाग्रामवर सहजरित्या नवे अकाउंट उघडता येईल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
गूगल सर्चमधील वैयक्तिक माहिती काढून टाकता येणार; लवकरच येणार ‘हे’ फीचर

संबंधित बातम्या

Jio चा शानदार प्लॅन! १४९ रुपयांत दररोज १ GB डेटा आणि बरंच काही…
iPhone १४ वर पहिल्यांदा मिळतेय २५००० पर्यंतची घवघवीत सूट; जाणून घ्या भन्नाट ऑफर

व्हिडिओ

ताज्या बातम्या
चीनमध्ये जनआंदोलनानंतर करोना निर्बंध शिथिल 
तृतीयपंथीयांना नोकरीची संधी डावलता येणार नाही; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
नेत्यांकडे स्वत:ची मते, व्यासंग असावा – देवेंद्र फडणवीस
गोवर रुग्णांच्या नमुन्यांच्या तपासणीसाठी हाफकीन तयार
Maharashtra Karnataka border: एसटीच्या ३८२ फेऱ्या अंशत: रद्द