अमेरिकन टेक कंपनी आणि सर्च इंजिन गुगलने, गुगल मॅप्स (Google Maps)वर भारतासाठी एक नवीन सुविधा सुरु करण्यात आली आहे. गुरुवार २७ जानेवारी २०२२ला या सुविधेची सुरुवात झाली. यामध्ये वापरकर्त्यांना आपल्या घरांचा ‘प्लस कोड पत्ता’ (Plus Codes) जाणून घेण्यासाठी आपल्या लोकेशनचा वापर करता येणार आहे.

गुगल मॅप्सच्या प्रोडक्ट मॅनेजर अमांडा बिशप यांनी सांगितले, “आम्ही आमच्या वापरकर्त्यांना सशक्त बनवू इच्छितो. ते याच क्रमाने त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी ‘प्लस कोड’ पत्त्यांचा वापर करू शकतील.” त्यांनी पुढे सांगितले, “आम्हाला आनंद आहे की भारतात ३ लाखांहून अधिक वापरकर्त्यांनी प्लस कोडच्या माध्यमातून आपल्या घरांचा पत्ता शोधला आहे.”

March 2024 Monthly Horoscope in Marathi
March 2024 Monthly Horoscope : मार्च महिन्यात या तीन राशींचे बदलणार नशीब? वैवाहिक जीवन, करिअर अन् आर्थिक लाभ; ज्योतिषशास्त्र काय सांगते…
Is eating poha better than idli for breakfast
Poha Or Idli : नाश्त्यात पोह्यापेक्षा इडली खाणे चांगले? मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोणता नाश्ता चांगला? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
boat
पालघर: कृत्रिम भित्तिका समुद्रात सोडणारी बोट सातपाटीच्या खडकावर अडकली
Analysis of adulterated food will be expedited report will be available within 14 days
भेसळयुक्त खाद्यपदार्थांचे विश्लेषण वेगात होणार, १४ दिवसांमध्ये मिळणार अहवाल

नव्या स्मार्टफोनमध्ये का नसतो रिमुव्हेबल बॅटरीचा पर्याय? जाणून घ्या या मागचं कारण

त्यांच्या म्हणण्यानुसार, गुगल मॅप्सवर होम लोकेशन सेव्ह केल्यानंतर भारतीय वापरकर्ते ‘आपल्या वर्तमान लोकेशनचा वापर करा’ हे फीचर पाहू शकतील. यामध्ये प्लस कोड तयार करण्यासाठी फोनच्या लोकेशनचा वापर केला जाईल. वापरकर्ते आपल्या घराच्या पत्त्याच्या रूपात याचा नंतर वापर करू शकतात. या पत्त्यांना शेअरसुद्धा केले जाऊ शकते.

तथापि, सध्या केवळ अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. काही वेळाने आयओएस प्लॅटफॉर्मवर देखील ही सुविधा दिली जाईल, असे कंपनीने सांगितले आहे.

काय आहे ‘प्लस कोड’ (Plus Codes) ?

‘प्लस कोड’ हे विनामूल्य, मुक्त स्रोत डिजिटल पत्ते आहेत जे योग्य औपचारिक पत्ता नसलेल्या ठिकाणाचीही अचूक माहिती देऊ शकतात. प्लस कोड रस्त्यांच्या आणि परिसराच्या नावांऐवजी अक्षांश आणि रेखांशावर आधारित असतात. तसेच, ते अक्षरे आणि आकड्यांची लहान मालिका म्हणून सादर केले जातात.

प्लस कोडमध्ये एखाद्या पत्त्यासाठी शहराच्या किंवा संबंधित भागाच्या नावासोबतच सहा किंवा सात अक्षरे आणि आकड्यांचा संच असतो. यामुळे योग्य ठिकाणी पोहोचता येते, तसेच यामुळे दुकाने शोधणे आणि त्यांच्यापर्यंत पोहोचणे देखील सोपे होते. प्लस कोडची सुरुवात २०१८ मध्ये झाली होती आणि तेव्हापासून देशातील गैर-सरकारी संस्था (NGO) आणि सरकारांनी मोठ्या प्रमाणावर याचा स्वीकार केला.

पॅनकार्डचा गैरवापर होण्याच्या घटनांमध्ये वाढ; तुमचे कार्ड तर यात नाही ना? ‘असे’ जाणून घ्या

कशी होईल प्लस कोडची ओळख ?

गुगल वेबसाइटनुसार, लोकांना प्लस कोडद्वारे डिलिव्हरी मिळू शकते. आपत्कालीन आणि सामाजिक सेवा मिळवता येतील किंवा त्या शोधण्यात इतरांना मदत करता येईल.

प्लस कोडचे फायदे

गुगलच्या म्हणण्यानुसार, हे कोड वापरण्यास अतिशय सोपे आहेत. परदेशात ज्याप्रकारे पारंपरिक कोड चालतात त्यांच्या तुलनेत हे कोड खूपच लहान आहेत. त्यामुळे ते शेअर करणे देखील सोपे आहे. विशेष म्हणजे, ऑनलाइन आणि ऑफलाइन असा दोन्ही पद्धतींमध्ये प्लस कोड काम करते. यासाठी इंटरनेट कनेक्शन सतत चालू असण्याची गरज नाही. भारताचा विचार करता ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण येथे अनेकदा इंटरनेट कनेक्शनची समस्या निर्माण होत असते.