आपल्यापैकी बरेच जण आता स्मार्टफोन युजर्स आहेत आणि प्रत्येकजण आपल्या दैनंदिन कामकाजासाठी आपल्या स्मार्टफोनवर अवलंबून असतो. उत्तम फीचर्स आणि स्पेसिफिकेशनसह जगभरातील युजर्सच्या गोपनीयतेवर देखील अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. बँक खात्याची माहिती, संदेश, फोटो आणि व्हिडीओ यांसारखा वैयक्तिक डेटा देखील आपल्या खिशात बसणाऱ्या या उपकरणात सेव्ह केला जातो. सायबर गुन्हे हे हल्लीच्या काळातलं वास्तव आहे आणि स्मार्टफोनमध्ये जतन केलेली गोपनीय माहिती नेहमीच धोक्यात असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुम्हाला तुमचा Android फोन हॅकर्सपासून वाचवायचा असेल तर किंवा तुमचा फोन हरवल्यास तुमचा डेटा सुरक्षित ठेवायचा असेल तर यासाठी अनेक मार्ग आहेत.

Lock your smartphone |  तुमचा स्मार्टफोन लॉक करा

तुमचे डिव्हाईस संरक्षित ठेवण्यासाठी तुमचा Android फोन लॉक ठेवणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. Android फोनसाठी फोन लॉक ठेवणे ही सर्वात महत्त्वाची सुरक्षितता आहे. उदाहरणार्थ, तुमचा फोन हरवल्यास किंवा कोणीतरी तो चोरला असल्यास त्यांना तुमचे डिव्हाईस अनलॉक करण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. या काळात तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड आणि बँक खाते ब्लॉक करू शकता. याशिवाय तुम्ही तुमच्या डिव्हाईसचा मागोवा घेऊ शकता. तुमच्या डिव्हाइसमध्ये पिन कोड टाकणे सर्वात सुरक्षित मानले जाते.

आणखी वाचा : फोनवरून DSLR सारखे फोटो क्लिक होतील! ३० हजारमध्ये मिळतात हे टॉप ५ कॅमेरा स्मार्टफोन

Download apps only from trusted sources | केवळ विश्वसनीय सोर्सवरूनच अ‍ॅप्स डाउनलोड करा

तुमच्याकडे अँड्रॉइड स्मार्टफोन असल्यास तुम्ही अ‍ॅप्स डाउनलोड करत असता. लक्षात ठेवा की, गेम आणि अ‍ॅप्स फक्त विश्वसनीय स्त्रोतांवरूनच डाउनलोड करा. Google Play Store हे Android फोनसाठी सर्वोत्तम व्यासपीठ आहे जिथून अ‍ॅप्स आणि गेम्स डाउनलोड केले जाऊ शकतात.  थर्ड-पार्ट वेबसाइट्स आणि अॅप स्टोअरवरून अ‍ॅप्स डाउनलोड करणे टाळा. अनेक वेळा हॅकर्स अशा ठिकाणाहून तुमच्या डिव्हाईसवर मालवेअर इन्स्टॉल करू शकतात.

Use Anti-Virus Software | अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर वापरा

अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर वापरून तुम्ही स्मार्टफोनमधील मालवेअर किंवा बग यासारख्या Android सुरक्षिततेशी संबंधित समस्यांचे निराकरण करू शकता. तुम्ही अवास्ट मोबाईल सिक्युरिटी, अँटीव्हायरस, नॉर्टन मोबाईल सिक्युरिटी सारखे अँटीव्हायरस सॉफ्टवेअर इन्स्टॉल करू शकता. हे अ‍ॅप्स मालवेअरसाठी तुमच्या डिव्हाईसचे मॉनिटर करून ते रिमूव्ह करू शकतात.

आणखी वाचा : Vivo V25  सीरीजचे महत्वाचे स्पेसिफिकेशन लॉंचपूर्वीच लीक, १२ GB रॅमसह ५० MP कॅमेरा

Keep your phone updated | तुमचा फोन अपडेट ठेवा

तुम्ही तुमचा Android स्मार्टफोन  लेटेस्ट वर्जन ओएस  OS वर अपडेट ठेवणे महत्त्वाचे आहे. तुमचा स्मार्टफोन आणि अ‍ॅप्स लेटेस्ट वर्जनमध्ये अपडेट ठेवल्याने तुमचे डिव्हाईस मालवेअर आणि बग हल्ल्यांचा धोका कमी करते.

Disable your Device from saving passwords | डिव्हाईसवर पासवर्ड सेव्ह करू नका

आपल्यापैकी बरेच जण आपल्या अ‍ॅप्सचा पासवर्ड सेव्ह करतो जे आपण नियमितपणे वापरतो. असे केल्याने साइन इन करणे सोपे आणि जलद होते. शिवाय, जर तुम्ही पासवर्ड विसरलात, तर पुन्हा रीसेट करण्यासाठी लागणारा वेळही वाचतो.

तुमचा Android स्मार्टफोन सुरक्षित ठेवण्यासाठी,अ‍ॅप्सना पासवर्ड सेव्ह करू न देणे महत्त्वाचे आहे. असे केल्याने सायबर हल्ल्यांचा धोका वाढतो.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Five tips to secure your android smartphone prp
First published on: 16-06-2022 at 21:32 IST