scorecardresearch

यावर्षी WhatsApp मध्ये करण्यात आले ‘हे’ बदल; यातील तुमच्या आवडीचे फीचर कोणते?

२०२२ मध्ये व्हॉटसअ‍ॅपच्या फीचर्समध्ये कोणते बदल करण्यात आले जाणून घ्या

यावर्षी WhatsApp मध्ये करण्यात आले ‘हे’ बदल; यातील तुमच्या आवडीचे फीचर कोणते?
२०२२ मध्ये व्हॉटसअ‍ॅपमध्ये झालेले बदल (प्रातिनिधिक फोटो)

व्हॉटसअ‍ॅप हे सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आहे. व्हॉटसअ‍ॅप वापरत नाहीत असे फार कमीजण आपल्या संपर्कात असतात. त्यामुळे सर्वांनकडेच उपलब्ध असणाऱ्या या अ‍ॅपवरून संवाद साधणे खुप सोपे होते. व्हॉटसअ‍ॅपवर कॉल, व्हिडीओ कॉल, मेसेज, व्हॉइस नोट, फोटो, व्हिडीओ शेअर करणे अशा अनेक सुविधा उपलब्ध आहेत. यासह व्हॉटसअ‍ॅपकडुन युजर्सना अधिक आकर्षित करण्यासाठी सतत नवनवे फीचर्स रोल आउट केले जातात. यावर्षी व्हॉटसअ‍ॅपवर कोणते फीचर रोल आउट करण्यात आले जाणून घ्या.

२०२२ मध्ये व्हॉटसअ‍ॅपमध्ये झालेले बदल

कम्युनिटी फीचर
कम्युनिटी फीचरचा वापर करून एकावेळी वेगवेगळ्या ग्रुप्समधील व्यक्तींना मेसेज पाठवणे शक्य झाले. यासाठी आधी व्हॉटसअ‍ॅपवर कम्युनिटी तयार करणे आवश्यक आहे, त्यामध्ये समाविष्ट व्यक्तींना एकावेळी मेसेज पाठवणे शक्य होते.

आणखी वाचा: गुगल फोटोमध्ये नवा अल्बम बनवायचा आहे? जाणून घ्या याच्या सोप्या स्टेप्स

व्हॉटसअ‍ॅप पोल
व्हॉटसअ‍ॅप पोल हे फीचर यावर्षीचे सर्वात मोठे आकर्षण ठरले. याचा वापर करून युजर्सना कोणत्याही गोष्टीवर मत नोंदवणे सहज शक्य झाले. कोणीही व्हॉटसअ‍ॅप पोल तयार करून त्यावर जास्तीत जास्त १२ किंवा त्यांना हवे तितके पर्याय देऊ शकतात.

व्हॉटसअ‍ॅप अवतार
हे फीचर वापरून युजर्सना ईमोजीप्रमाणे अवतार शेअर करता येतो. हे फीचर म्हणजे तुमचे स्वरूप शेअर करता येण्याची संधी आहे. तुम्हाला एखादा मेसेज पाहून काय वाटले यासाठी ‘अवतार’ शेअर करून व्यक्त होऊ शकता. याआधी हे फीचर फेसबूक आणि इन्स्टाग्रामवर उपलब्ध होते, यावर्षी हे फीचर व्हॉटसअ‍ॅपवरही उपलब्ध झाले.

स्वतःला मेसेज करण्याचा पर्याय
यावर्षी व्हॉटसअ‍ॅपवर स्वतःला मेसेज करण्याचा पर्याय उपलब्ध झाला. व्हॉटसअ‍ॅपवरील कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये पहिला क्रमांक हा आपला दिसतो, त्यावर क्लिक करून आपण स्वतःशी चॅट करू शकतो, महत्त्वाच्या नोट्स सेव्ह करू शकतो.

आणखी वाचा: गुगल फोटोमध्ये नवा अल्बम बनवायचा आहे? जाणून घ्या याच्या सोप्या स्टेप्स

फोटो अपलोड क्वालिटी बदलणे
यावर्षी व्हॉटसअ‍ॅपवर फोटो अपलोड क्वालिटी बदलण्याचा पर्याय उपलब्ध झाला. या फीचरचा वापर करून युजर्स बेस्ट क्वालिटी फोटो शेअर करू शकतात. यासह ‘डेटा सेवर’ हा पर्यायही उपलब्ध होतो.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-12-2022 at 18:11 IST

संबंधित बातम्या