Flipkart Big Bachat Dhamaal Sale: विवो, सॅमसंग, पोको आणि मोटोरोला फोनवर बंपर सूट, हजारोंची बचत

ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर Big Bachat Dhamaal Sale सुरू झाला आहे. बिग बचत धमाल सेल २० मे पासून सुरू झालाय आणि २२ मे, सोमवार पर्यंत चालेल. या सेलमध्ये स्मार्टफोनसह फॅशन, इलेक्ट्रॉनिक्स अशा अनेक प्रकारच्या प्रोडक्टवर सूट दिली जात आहे.

big-bachat-dhamaal
(फोटो-फ्लिपकार्ट)

ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर Big Bachat Dhamaal Sale सुरू झाला आहे. बिग बचत धमाल सेल २० मे पासून सुरू झालाय आणि २२ मे, सोमवार पर्यंत चालेल. या सेलमध्ये स्मार्टफोनसह फॅशन, इलेक्ट्रॉनिक्स अशा अनेक प्रकारच्या प्रोडक्टवर सूट दिली जात आहे. Motorola Edge 20 Fusion 5G, Moto G31, Vivo T1 5G, Poco M4 Pro सारखे स्मार्टफोन फ्लिपकार्ट बिग बचत धमाल सेलमध्ये डिस्काउंटवर मिळत आहेत. या फोन्सवर डिस्काउंटसोबतच एक्सचेंज ऑफरही मिळणार आहेत. फ्लिपकार्ट सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि अॅक्सेसरीजवर ८० टक्क्यांपर्यंत सूट देण्याचा दावा करण्यात आला आहे. याशिवाय Flipkart वर रविवारी दुपारी १२, सकाळी ८ आणि संध्याकाळी ४ वाजेपर्यंत मर्यादित कालावधीतील डील उपलब्ध असतील.

तीन दिवसीय फ्लिपकार्ट बिग बचत धमाल सेलमध्ये Moto G31 १०,९९९ रूपयांमध्ये मिळतोय. हा फोन १२,९९९ रुपयांना लॉन्च करण्यात आला होता. दुसरीकडे, Motorola Edge 20 Fusion 5G स्मार्टफोन १८,९९९ रुपयांना मिळतोय, तर हा फोन गेल्या वर्षी २१,४९९ रुपयांना लॉन्च करण्यात आला होता. त्याचप्रमाणे, Moto G40 Fusion १७,९९९ च्या लॉन्च प्राईजऐवजी १४,४९९ मध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे.

Flipkart सेलमध्ये, Poco M Pro 4G स्मार्टफोन १२,९९९ मध्ये खरेदी करण्याची संधी आहे. हा फोन गेल्या वर्षी १४,९९९ रुपयांना लॉन्च करण्यात आला होता. Poco C31 सेलमध्ये ७,९९९ रुपयांऐवजी ७,४९९९ रुपयांना मिळण्याची संधी आहे. तसंच Poco M3 Pro 5G चा ४ GB रॅम आणि ६४ GB स्टोरेज व्हेरिएंट १४,४९९ रुपयांना उपलब्ध करून देण्यात आला आहे.

आणखी वाचा : Jio, Airtel, Vi: एकदा रिचार्ज करा वर्षभर फुकट बोला; जाणून घ्या काही भन्नाट प्लॅन्स

याशिवाय Vivo T1 5G ची सुरुवातीची किंमत १५,९९० रुपये आहे. हा फोन फेब्रुवारीमध्ये १५,९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह लॉन्च करण्यात आला होता. Samsung Galaxy A52S 5G चे ६ GB रॅम आणि १२८ GB स्टोरेज व्हेरिएंट ३०,९९९ रुपयांना सेलमध्ये घेतले जाऊ शकते.

फोन व्यतिरिक्त, Flipkart Big Bachat Dhamaal Sale देखील गेमिंग अॅक्सेसरीजवर ८०% पर्यंत सूट देत आहे. तसंच टीव्हीवर ७० टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे. लॅपटॉप अॅक्सेसरीज, टीव्ही स्ट्रीमिंग डिव्हाइसेस आणि वायरलेस इअरबड्सवर बचत करण्याची संधी देखील मिळतेय.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Flipkart big bachat dhamaal sale live from 20 may to 22 may deals discounts on motorola poco vivo samsung smartphones tv prp

Next Story
गुड न्यूज! १५१ रुपयांचा स्वस्त प्रीपेड पॅक आलाय, मोफत पाहा डिस्ने + हॉटस्टार आणि 8 जीबी डेटा सुद्धा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी