आगामी फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये सॅमसंगने त्याच्या निवडक गॅलेक्सी स्मार्टफोन्सवर सवलत जाहीर केली आहे. या सेलची २३ सप्टेंबरपासून विक्री सुरू होईल. सणासुदीच्या काळात, Samsung Galaxy S21 FE 5G, Galaxy S22+, Galaxy F13 आणि Galaxy F23 5G सारख्या प्रीमियम Galaxy फोनवर 57% पर्यंत सूट देत आहे.

Samsung Galaxy S21FE 5G

Samsung Galaxy S21 FE 5G सहसा ७४,९९९ रुपयांना विकला जातो. पण सेलमध्ये हा फोन ३१,९९९ रुपयांना विकला जाईल. कंपनीने या फोनवर ५७% सूट देण्याची घोषणा केली आहे. हा सॅमसंग फोन प्रो-ग्रेड OIS कॅमेरा आणि ड्युअल रेकॉर्डिंगसह येतो. हँडसेटमध्ये ४५००एमएएच बॅटरी आहे जी IP68 धूळ आणि पाणी प्रतिरोधक आहे.

( हे ही वाचा: GB Whatsapp म्हणजे काय; ते तुमच्यासाठी सुरक्षित आहे की नाही? ते कसे डाउनलोड कराल, सर्व काही जाणून घ्या)

Samsung Galaxy S22+

सॅमसंग गॅलेक्सी S22+ सेलमध्ये ५९,९९९ रुपयांना खरेदी करता येईल. हा फोन सध्या फ्लिपकार्टवर ८४,९९९ रुपयांना विकला जात आहे. Qualcomm Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर आणि प्रो-ग्रेड ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप फोनमध्ये देण्यात आला आहे.

त्याच वेळी, सॅमसंगचे लोकप्रिय Galaxy F23 5G आणि Galaxy F13 स्मार्टफोन अनुक्रमे १०,९९९ आणि ८,४९९ रुपयांना विक्रीमध्ये खरेदी केले जाऊ शकतात. फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल दरम्यान या फोनवर इतर अनेक ऑफर देखील उपलब्ध असतील.

( हे ही वाचा: IRCTC ने करोडो प्रवाशांना दिली खुशखबर! तिकीट बुकिंगवर होणार मोठा फायदा, ऐकून तुम्हालाही आनंद होईल)

Galaxy S22+ आणि Galaxy F13 च्या ऑफर १६ सप्टेंबर, दुपारी १ पासून लाइव्ह झाल्या आहेत. त्याच वेळी, Galaxy S21 FE 5G वरील ऑफर १९ सप्टेंबरपासून लाव्ह असतील. Galaxy F13 ऑफर Flipkart Plus ग्राहकांसाठी २२ सप्टेंबर रोजी लाव्ह होतील.

याशिवाय फ्लिपकार्टने ओप्पो, पोको, मोटोरोला आणि इन्फिनिक्सच्या स्मार्टफोन्सवर उपलब्ध असलेल्या ऑफर्सची माहिती दिली आहे. Poco F4 5G २१,९९९ रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध असेल, तर Poco X4 Pro 5G १३,९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत मिळू शकेल. त्याच वेळी, Poco M4 5G १५,९९९ रुपयांना आणि प्रो मॉडेल ११,४९९ रुपयांना सेलमध्ये उपलब्ध केले जाईल. Motorola Edge ३० स्मार्टफोन बिग बिलियन डेज सेलमध्ये २२,७४९ रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो.