फ्लिपकार्ट दिवाळी सेलला सुरूवात झाली आहे. हा सेल १९ ते २३ ऑक्टोबर पर्यंत असणार आहे. गेल्या महिन्यापासूनच फेस्टिव सेलची सुरूवात झाली होती. आता दिवाळीनिमित्त विशेष सेलची सुरूवात झाली आहे. या सेलमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक वस्तूंवर मोठी सूट देण्यात आली आहे. यामध्ये ‘पेटीएम वॉलेट’ आणि ‘यूपीआय ट्रांजेक्शन’च्या माध्यमातून खरेदी केल्यास १० टक्क्यांचा इन्स्टंट कॅशबॅक मिळणार आहे. तसेच एसबीआय क्रेडिट कार्ड आणि ईएमआय ट्रांजेक्शनच्या माध्यमातून खरेदी केल्यासही १० टक्क्यांचा इन्स्टंट कॅशबॅक मिळणार आहे.

फ्लिपकार्ट दिवाळी सेलमध्ये सॅमसंग, अ‍ॅपल, विवो, रेडमी, पोको या फोन्सवर मोठी सूट देण्यात येत आहे. या सेलमध्ये या फोन्सची किंमत किती आहे जाणून घ्या.

Advocates Black Coat is Optional in Summer Marathi News
Too Much Heat: प्रचंड उकाड्यामुळे वकिलांना ड्रेसकोडमधून सवलत; काय आहेत नियम?
mumbai metro marathi news, mumbai metro latest marathi news
मेट्रो १ आता लवकरच एमएमआरडीएच्या मालकीची, एमएमओपीएल विरोधातील दिवाळखोरीची याचिका निकाली
Mumbai road mastic, Mumbai potholes road,
मुंबई : खड्ड्यांना ‘मास्टिक’ची मलमपट्टी, प्रयोगांना सोडचिठ्ठी देत नव्या प्रशासनाचे जुन्या पद्धतीलाच प्राधान्य
Byju employees lost their jobs
नोटीस पीरियड नाही, पगारही नाही; फक्त एक फोन कॉल अन् बायजूच्या कर्मचाऱ्यांनी नोकरी गमावली

आयफोन १२ मिनी (Apple iPhone 12 Mini)
फ्लिपकार्ट दिवाळी सेलमध्ये आयफोन १२ मिनी ३८,९९० रुपयांमध्ये उपलब्ध आहे. हा फोन ‘आयओएस १६’ यंत्रणेवर अपग्रेड करण्यात आला आहे.

सॅमसंग गॅलक्सी एस २१ एफई (Samsung Galaxy S21 FE 5G)
फ्लिपकार्ट दिवाळी सेलमध्ये हा फोन ३५,९९९ रुपयांमध्ये हा फोन उपलब्ध आहे. या फोनमध्ये ३२ मेगापिक्सल कॅमेरा, ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज उपलब्ध आहे.

आणखी वाचा : घरबसल्या करा पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक! काय आहे ऑनलाईन प्रक्रिया जाणून घ्या

रेडमी १० (Redmi 10)
‘रेडमी १०’ हा फोन फ्लिपकार्ट दिवाळी सेलमध्ये ८,९९९ रूपयांमध्ये उपलब्ध आहे. या फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज उपलब्ध आहे.

विवो वी २५ प्रो ५ जी (vivo V25 Pro 5G)
८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असणारा हा फोन फ्लिपकार्ट दिवाळी सेलमध्ये ३५,४९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे.