उद्या सर्व देशभरामध्ये विजयादशमी म्हणजेच दसरा हा सॅन साजरा केला जाणार आहे. दसऱ्यानिमित्त लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट असणाऱ्या फ्लिपकार्टने दसरा स्पेशल सेलची घोषणा केली आहे. काही दिवसांपूर्वीच कंपनीचा बिग बिलियन डेज सेल संपला आहे. आयफोन १४ फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलमध्ये सर्वात कमी किंमतीमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला होता. या सेलमध्ये सर्वात जास्त विक्री होणार फोन देखील आयफोन १४ च होता. आयफोन १४ मागील वर्षी लॉन्च करण्यात आला होता. आता आयफोन १५ सिरीज लॉन्च केल्यानंतर कंपनीने आयफोन १४ सिरीजमधील फोनच्या किंमतीमध्ये घट केली आहे. आता दसऱ्याच्या सेलमध्ये खरेदीदारांना आयफोन १४ हा स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. फ्लिपकार्टच्या दसऱ्याच्या सेलमध्ये आयफोन १४ स्वस्तात कसा खरेदी करता येणार आहे, त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

आयफोन १४: फीचर्स

आयफोन १४ फोनमध्ये आयफोन १३ प्रमाणेच चिपसेटचा सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच आयफोन १३ प्रमाणेच आयफोन १४ मध्ये नॉचसह ६.१ इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यामध्ह्ये व्हिडीओ कॉल आणि सेल्फीसाठी १२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फ्लिपकार्ट आणि अमेझॉन सेलमध्ये आयफोन १४ वर आकर्षक सूट मिळाल्यामुळे खरेदिदारांचे लक्ष आयफोन १४ कडे आकर्षित झाले. याबाबतचे वृत्त dnaindia ने दिले आहे.

A girl told the incident of how she got Rs 2 back while buying a ticket in a metro station
तिकीटातील २ रुपये परत केले नाही म्हणून तरुणीने लढवली शक्कल, पुणे मेट्रो स्टेशनवरील व्हिडीओ व्हायरल
Samsung launched on Friday a new variant of its popular budget F15 smartphone Here is all the details
२० हजारांपेक्षा कमी किमतीत सॅमसंगचा ट्रिपल कॅमेरा सेटअपचा स्मार्टफोन; बॅटरी लाईफ बघून म्हणाल ‘डील Done’
irctc indian railways black box of indian railway crew voice video recording system cvvrs installed in trains loco engine
रेल्वेगाड्यांमध्येही आता विमानासारखी ‘ब्लॅक बॉक्स’ यंत्रणा, अपघात रोखण्यासाठी होईल उपयोग; वाचा
Hero Pleasure Plus Xtec Sports launch
Activa, Jupiter समोर तगडं आव्हान; ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह देशात आली हिरोची नवी स्कूटर, ८० हजारांहून कमी किंमत

हेही वाचा : रिलायन्स जिओने लॉन्च केला ‘हा’ भन्नाट प्लॅन, प्राइम व्हिडीओसह मिळणार…, एकदा पाहाच

आयफोन १४: ऑफर्स

फ्लिपकार्टच्या दसरा सेलमध्ये आयफोन १४ वर ३९,९०० रुपयांचा डिस्काउंट देत आहे. यामुळे हा फोन केवळ १७,०९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. आयफोन १४ मागील वर्षी आयफोन १४ प्रो आणि आयफोन १४ प्लस सह ७९,९०० रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीमध्ये लॉन्च करण्यात आला होता. आयफोन १५ सिरीज लॉन्च झाल्यानंतर आयफोन १४ ची किंमत १० हजारांनी कमी करण्यात आली आहे.

आयफोन १४ सध्या १२,९०१ रुपयांच्या डिस्काउंटनंतर फ्लिपकार्टवर ५६,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. याशिवाय खरेदीदारांना एसबीआय, आरबीएल आणि कोटक बँकेच्या क्रेडिट कार्डवर ७५० रुपयांची सूट मिळू शकते. ज्यामुळे या फोनची किंमत ५६,२४९ रुपये होते. याशिवाय फ्लिपकार्ट तुमच्या जुन्या स्मार्टफोनच्या बदल्यात ३९,१५० रुपयांचा डिस्काउंट देत आहे. सर्व ऑफर्स आणि डिस्काउंटसह तुम्हाला आयफोन १४ हा फोन फ्लिपकार्टच्या दसरा स्पेशल सेलमधून केवळ १७,०९९ रुपयांमध्ये खरेदी करता येऊ शकतो.