iPhone 12 Offers: iPhone 12 खरेदी करायचा, तर हीच ती वेळ आहे. तुमची प्रतिक्षा फळाला आली आहे. कारण Apple चा iPhone 12 तुम्हाला आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. तुमच्या खास बजेटमध्ये हा हँडसेट तुम्हाला मिळणार आहे. फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये ही संधी मिळणार आहे. जाणून घेऊया या ऑफरबद्दल…

iPhone 12 अशी आहे ऑफर

best time to shower morning or night what time of day should you shower heres what doctors recommend read
सकाळ की रात्र; अंघोळीची योग्य वेळ कोणती? डॉक्टर काय सांगतात? वाचा….
Before Going For Evening Gym Beetroot juice or coffee Which Drink is better For Your Health Read What Experts Said
जिमला जाण्यापूर्वी ‘या’ वेळेत करा बीटाच्या रसाचे सेवन; स्नायू राहतील मजबूत, वाचा तज्ज्ञ काय म्हणतात
Kitchen Jugaad how to use lemon to Clean gas
Kitchen Jugaad: गॅसवर लिंबू टाकताच होईल कमाल, पाहा भन्नाट किचन जुगाड व्हिडीओ
vada pav recipe
वडापाव नव्हे! इडली वडापाव; कधी खाल्ला का? जाणून घ्या ही सोपी रेसिपी

आयफोन 12 आता भारतात फ्लिपकार्टवर ४८,९९९ रुपयांना उपलब्ध असून ई-कॉमर्स वेबसाइट ६४ जीबी iPhone 12 वर ७,१३० रुपयांची सूट देत आहे. हा फोन भारतात २०२० मध्ये लाँच करण्यात आला होता. त्या वेळी त्याची किंमत ७९,९९० रुपये होती. याशिवाय फ्लिपकार्ट एक्सचेंज डिस्काउंट देखील देत आहे. ज्यामुळे त्याची किंमत आणखी कमी होईल. फ्लिपकार्टवर त्याची किंमत आणखी कमी करण्यासाठी ग्राहक बँक ऑफर देखील घेऊ शकतात.

iPhone 12 वर उपलब्ध असलेल्या बँक ऑफरचाही ग्राहक लाभ घेऊ शकतात. आयफोन 12 पूर्वी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर ५६,१२९ रुपयांना सूचीबद्ध होता, जो सवलतीनंतर ४८,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय, तुम्हाला १७,५०० रुपयांची एक्सचेंज डिस्काउंट देखील मिळू शकते, जी निवडक फोनवर उपलब्ध आहे.

(आणखी वाचा : UPI Payment: आता यूपीआय व्यवहारांवर मर्यादा येण्याची शक्यता; किती रुपयांपर्यंत करता येणार ट्रॅन्झॅक्शन्स, काय असणार नवीन नियम जाणून घ्या…)

फ्लिपकार्टवर फेडरल बँक डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड व्यवहारांवर अतिरिक्त १० टक्के सूट उपलब्ध आहे. फोनचा १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंट ५३,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. त्याच वेळी, त्याचा २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंट ६१,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

Apple iPhone 12 असा आहे खास

iPhone 12 मध्ये ६.१-इंचाच्या OLED पॅनेलसह येतो. यात सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले आहे, ज्याच्या संरक्षणासाठी सिरॅमिक शील्ड वापरण्यात आली आहे. हँडसेट A14 बायोनिक चिपसेटवर काम करतो. हँडसेट ६४जीबी, १२८ जीबा आणि २५६ जीबी स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

 iPhone 12 दोन १२ MP सेन्सरच्या ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह येतो. यासोबतच १२-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देखील आहे. धूळ आणि पाणी प्रतिरोधक असण्यासाठी याला IP68 रेटिंग देखील मिळाली आहे.यामध्ये तुम्हाला १७ तासांचा बॅटरी बॅकअप मिळतो.