scorecardresearch

केवळ ‘इतक्या’ रुपयांत व्हा iPhone चे मालक! ‘Flipkart’ वर घसघशीत ऑफर; जाणून घ्या सविस्तर

iPhone वर मिळतोय बिग डिस्काउंट, लवकर घ्या संधीचा फायदा…

Apple iPhone
Flipkart वर iPhone 14 आणि iPhone 14 Plus वर जबरदस्त डिस्काउंट (फोटो-indianexpress)

जर तुम्हाला आयफोन आवडत असेल आणि तो खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्हाला स्वतःसाठी एक उत्तम फोन घ्यायचा असेल तर ही एक चांगली संधी आहे ज्यामध्ये तुम्ही अगदी कमी किमतीत iPhone 14 स्मार्टफोन खरेदी करु शकता. वास्तविक, iPhone 14 आणि iPhone 14 Plus Flipkart वर मोठ्या ऑफर्ससह ऑफर केले जात आहेत ज्यात तुम्ही दोन्ही स्मार्टफोन बंपर डिस्काउंटवर खरेदी करू शकता.

iPhone 14 आणि iPhone 14 Plus वर थेट डिस्काउंटशिवाय क्रेडिट कार्ड डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. या ऑफर्सचा अवलंब करून तुम्ही अगदी कमी किमतीत स्मार्टफोन खरेदी करू शकता. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या स्मार्टफोनमध्ये कोणती सूट मिळत आहे आणि तुम्ही त्याचा कसा फायदा घेऊ शकता.

(हे ही वाचा : Samsung Galaxy S23 Series १ फेब्रुवारीला करणार मार्केटमध्ये एंट्री, ‘हे’ असतील तगडे फीचर्स)

iPhone 14 ऑफर

iPhone 14 चा १२८GB व्हेरिएंट फ्लिपकार्टवर ७९,९०० रुपयांना लिस्ट झाला आहे, जो ७२,९९९ रुपयांना विकला जात आहे. यासोबतच यामध्ये २३,००० रुपयांची एक्सचेंज डिस्काउंटही दिली जात आहे. याशिवाय तुम्ही हा स्मार्टफोन Flipkart Axis Bank कार्डने खरेदी केल्यास HDFC बँक क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डने खरेदी केल्यास तुम्हाला ५ टक्के सूट आणि ४००० रुपयांची झटपट सूट मिळू शकते. याशिवाय तुम्ही EMI वरही फोन खरेदी करू शकता.

iPhone 14 Plus ऑफर

iPhone 14 Plus च्या 128GB व्हेरिएंटची किंमत ९८,९०० रुपये आहे, जी फ्लिपकार्टवर ८१,९९९ रुपयांना विकली जात आहे. या स्मार्टफोनवर २३,००० रुपयांची एक्सचेंज डिस्काउंट, फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्डवर ५ टक्के सूट आणि HDFC बँक क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डने खरेदी केल्यास ४००० रुपयांची झटपट सूट देखील दिली जात आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-02-2023 at 15:43 IST