चविष्ट जेवण हा प्रत्येकाचा वीक पॉईंट असतो. मित्रांसोबतचे नाईट आउट असो किंवा कुटुंबासोबतचे एखादे सेलिब्रेशन अशावेळी आपण सहज ऑर्डर करू ना म्हणत ऑनलाईन जेवणाची ऑर्डर देतो. ऑनलाईन जेवण मागवण्याची आपल्याला इतकी सवय झाली आहे की, जेवण बनवण्याचा कंटाळा आला की आपण लगेच काहीतरी मागवतो. भारतात स्विगी आणि झोमॅटो हे दोन लोकप्रिय ऑनलाईन फूड डिलिव्हरी ॲप आहेत. करोना काळात जेव्हा बाहेर जाण्यास बंदी होती तेव्हादेखील स्विगी आणि झोमॅटो खवय्यांची इच्छा पुर्ण करण्यासाठी तत्पर होते. आतातर ऑनलाइन जेवण ऑर्डर करण्याची काही जणांना इतकी सवय लागलेली दिसते की, काहीतरी ऑर्डर केल्याशिवाय पोट भरत नाही असे त्यांना वाटते. पण यामुळे त्यांचे खर्चाचे गणित बिघडण्याची शक्यता असते.

आपण कितीतरी वेळा स्विगीवरुन सहज जेवण ऑर्डर करतो. पण आपल्याला त्यावर आतापर्यंत एकुण किती खर्च झाला हे माहित नसते. आता हा खर्च जाणून घेणे शक्य आहे. एक सोप्पी ट्रिक वापरून तुम्ही आजपर्यंत स्विगीवर किती रुपयांची ऑर्डर दिली आहे हे जाणून घेता येईल.

Looking For mid range Good smartphone with Best Long stellar battery life Check Out These Five Options
फक्त एकदाच चार्ज करा; बेस्ट बॅटरी लाईफ असणारे ‘हे’ पाच स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदी करा; संपूर्ण यादी पाहाच
Amazon Gudi Padwa Sale 2024 going to offer deals and more on online shopping sites Read Everything About Offers
गुढीपाडव्यानिमित्त ॲमेझॉनचा बंपर सेल सुरू; साडी, दागिने अन् इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर भरघोस सूट, तुम्ही कधी करताय खरेदी?
why Tata and Wipro want to buy Aachi Masala food company
Tata and Wipro : टाटा – विप्रो कंपनीला आची मसाला कंपनी २००० कोटी रुपयांना का खरेदी करायची आहे?
how to choose right sports bra these small 6 tips can help you find correct fitting
जिमसाठी पहिल्यांदाच स्पोर्ट्स ब्रा खरेदी करताय? मग ‘या’ सहा गोष्टींची काळजी घ्या

आणखी वाचा : आता रेल्वे प्रवासादरम्यान जेवणाची चिंता मिटली! व्हाट्सअ‍ॅपवरून देता येणार ऑर्डर

या स्टेप्स वापरून जाणून घ्या स्विगीवर आजपर्यंत किती खर्च झाला

  • सर्वात आधी लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर स्विगीची वेबसाईट उघडा. त्यामध्ये मोबाईल क्रमांक किंवा ईमेलद्वारे लॉग इन करा.
  • त्यानंतर सर्वात वर उजव्या बाजूला तुमच्या नावावर क्लिक करा.
  • त्यामध्ये ऑर्डर्सवर क्लिक करा. त्या पेजवर सर्वात खाली ‘शो मोर ऑर्डर्स’ (Show More Orders) वर क्लिक करुन खाली स्क्रोल करत राहा.
  • जेव्हा तुम्ही ऑर्डर हिस्ट्री (Order History) च्या शेवटी पोहचाल, तेव्हा राईट क्लिक करून, इन्स्पेक्ट (Inspect) या पर्यायावर क्लिक करा.
  • आता त्या पेजच्या शेवटी दिलेल्या कनसोल (Console) पर्यायावर क्लिक करा.
  • त्यामध्ये दिलेल्या कोडला कनसोलमध्ये पेस्ट करा आणि एंटर बटण क्लिक करा.
  • एंटर क्लिक करताच तुम्ही आजपर्यंत स्विगीवरून किती रुपयांची ऑर्डर दिली आहे ती रक्कम दिसेल. अशाप्रकारे तुम्हाला खर्चाचे गणित जुळवताना या ट्रिकमुळे नक्की मदत होईल.