भारत हा देश विकसनशील देश आहे. हा देश बऱ्याच कालावधीपासून स्वतःची ऑपरेटिंग सिस्टीम विकसित करण्याचा पर्यटन करत आहे. यामध्ये आपल्याला यश मिळत आहे. आधुनिक तंत्रज्ञान, संरक्षण प्रणाली सर्वच क्षेत्रात भारत स्वदेश निर्मितीवर मोठ्या प्रमाणात भर देत आहे. यातच IIT मद्रासने गेल्या आठवड्यामध्ये एक गोपनीयतेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी नेटिव्ह ऑपरेटिंग सिस्टीम लाँच केली आहे. BharOS असे या सिस्टीमचे नाव आहे. यामुळे युजर्सना काय फायदा होणार आहे ते आपण जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

IIT मद्रास फर्म JandK ऑपरेशन्स (JandK Ops) ने एक नवीन ऑपरेटिंग सिस्टीम जाहीर केली आहे. ही BharOS नावाची मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम आहे. फर्मचे म्हणणे आहे की या ऑपरेटिंग सिस्टममधील वापरकर्त्यांच्या गोपनीयतेवर लक्ष केंद्रित केले आहे. असे वापरकर्ते अधिक गोपनीयता हवी आहे, ते ते निवडू शकतात.

हेही वाचा : Apple ने लाँच केला नवीन MacBook Pro, जाणून घ्या स्टोरेज पासून किंमतीपर्यंत

युजर्स ही सिस्टीम कमर्शियल हॅण्डसेटवर इन्स्टॉल करू शकतात. ऑपरेटिंग सिस्टीम नो-डिफाल्ट अ‍ॅप्ससह येते. म्हणजेच युजर्सला यात कोणतेही डिफाल्ट अ‍ॅप मिळणार नाही. युजर्स त्यांच्या आवडीचे अ‍ॅप्स डाउनलोड करू शकतात.

या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये काय आहे खास ?

BharOS मध्ये युजर्स खासगी अ‍ॅप स्टोअरमधून त्यांच्या आवडीचे अ‍ॅप डाउनलोड करू शकणार आहेत. IIT मद्रास फर्म JandK ऑपरेशन्सने याचे काही स्क्रीनशॉट देखील शेअर केले आहेत. ही ऑपरेटिंग सिस्टम अँड्रॉइड-ओपन सोर्स प्रोजेक्टवर आधारित आहे. याबाबत माहिती देताना IIT मद्रासने सांगितले की, BharOS ही अशी ऑपरेटिंग सिस्टम आहे ज्यात युजर्सना अधिक स्वातंत्र्य , कंट्रोल आणि फ्लेक्सिबिलिटी देते. तसेच यात युजर्सना नेटिव्ह ओव्हर द एअर (NOTA) अपडेट मिळणार आहे. मात्र सध्या ही सिस्टीम सर्वांसाठी उपलब्ध असल्याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. यासाठी आयआयटी मद्रासची दूरसंचार कंपन्या, सरकारी संस्था आणि खाजगी उद्योगांशी बोलणी सुरु आहेत.

हेही वाचा : नवीन स्मार्टफोन्स खरेदी करण्याचा विचार करताय? Samsung पासून Oppo पर्यंत जबरदस्त फिचरचे ‘हे’ फोन पाहाच

ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे काय?

कोणत्याही डिव्हाइससाठी ऑपरेटिंग सिस्टीम ही महत्वाची असते. ज्या सिस्टीमवर डीव्हीएस काम करते त्यालाच ऑपरेटिंग सिस्टीम म्हटले जाते. जसे की तुम्हाला कोणत्याही Android स्मार्टफोनमध्ये Android OS ही सिस्टीम मिळते. तर आयफोनमध्ये iOS सिस्टीम मिळते.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: For users benifit iit madras launched bharos operating system tech news tmb 01
First published on: 23-01-2023 at 11:04 IST