युपीआय हे एक असे तंत्रज्ञान आहे ज्याचा उपयोग देशभरात कुठेही झटपट पैसे हस्तांतरण करण्यासाठी होतो. देशातील १५० दशलक्षाहून अधिक वापरकर्ते युपीआय वापरतात. युपीआयच्या मदतीने वापरकर्ते फक्त त्यांचा युपीआय आयडी वापरून पैसे ट्रान्सफर करू शकतात. यामुळे त्यांना बँक अकाउंट नंबर किंवा इतर कोणतेही तपशील शेअर करण्याची गरज नाही. युपीआय आयडी भीम युपीआय सह इंटिग्रेटेड केलेल्या पेमेंट अ‍ॅपमध्ये तयार करणे आवश्यक आहे. पेटीएम, फोनपे आणि गुगल पे सारखे अनेक डिजिटल पेमेंट अ‍ॅप्स आहेत ज्याद्वारे पैसे हस्तांतरित केले जाऊ शकतात. या अ‍ॅप्समध्ये युनिक युपीआय आयडी किंवा व्हर्च्युअल पेमेंट अँड्रेस (व्हीपीए) आहे जो पेमेंट ट्रान्सफरसाठी आवश्यक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुम्ही तुमचा युपीआय आयडी विसरला असाल तर आज आपण गुगल पे, पेटीएम किंवा फोनपे यांच्या मदतीने तुमचा आयडी कसा ओळखू शकतो हे जाणून घेणार आहोत.

छोटे बदल मोठा आर्थिक फायदा; लाइट बील कमी करण्यासाठी ‘या’ खास Tips तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील

फोनपेमध्ये युपीआय आयडी कसा शोधायचा?

युपीआय व्यवहारांसाठी फोनपे हे अ‍ॅप वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. फोनपेमध्ये युपीआय आयडी शोधण्याचा मार्ग अगदी सोपा आहे.

  • सर्वप्रथम तुमच्या फोनवर फोनपे अ‍ॅप उघडा.
  • आता स्क्रीनच्या वरच्या डाव्या कोपर्‍यात तुमच्या प्रोफाइल पिक्चरवर टॅप करा
  • आता युपीआय सेटिंग्ज वर क्लिक करा
  • आता तुम्हाला तुमच्या बँक खात्याशी संबंधित युपीआयआयडी दिसेल

भारताने जगाला दाखवून दिली होती आपली ताकद; जाणून घ्या National Technology Day चा इतिहास

पेटीएम अ‍ॅपमध्ये युपीआय आयडी कसा शोधायचा?

  • सर्वप्रथम तुमच्या फोनवर पेटीएम अ‍ॅप उघडा
  • आता स्क्रीनच्या वरच्या डाव्या कोपर्‍यात दिसणार्‍या प्रोफाइल पिक्चरवर क्लिक करा
  • आता तुम्हाला तुमच्या क्यूआर कोडच्या वर युपीआय आयडी दिसेल.

गुगलपेमध्ये युपीआय आयडी कसा शोधायचा?

  • सर्व प्रथम स्मार्टफोनवर गुगलपे अ‍ॅप उघडा
  • आता अ‍ॅपच्या वरच्या उजव्या कोपर्‍यात तुमच्या प्रोफाइल पिक्चरवर टॅप करा
  • आता तुमचा युपीआय आयडी जाणून घेण्यासाठी बँक खाते निवडा
  • तुम्हाला ‘युपीआय आयडी’ सेक्शनमध्ये आपला आयडी दिसेल
मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Forgot your upi id no worries easily find it on paytm phonepe and google pay pvp
First published on: 14-05-2022 at 10:06 IST