Apple Smart Water Bottle Price, Features: जिथे आतापर्यंत Apple चे आयफोन लोकप्रिय होते, तिथे आता कंपनीने एक असं प्रोडक्ट लॉन्च केलं आहे जे लोकांना खूप आवडेल. खरं तर अॅपलने पाण्याची बाटली बाजारात आणली आहे. जर तुम्ही त्याची किंमत ऐकली तर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. कंपनीने त्याची किंमत $59.95 ठेवली आहे. भारतीय किंमतीनुसार सुमारे ४,६०० रुपये इतकी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Apple ने यापूर्वी पॉलिशिंग क्लॉथ सुमारे १९०० रुपयांना लॉन्च केले होते. त्याच पद्धतीने ही बाटलीही लॉन्च करण्यात आली आहे. ही बाटली अमेरिकेतील HidrateSpark नावाच्या ट्रिलियन डॉलर कंपनीने लॉन्च केली आहे. HidrateSpark पाण्याची बाटली Apple च्या वेबसाइटवर आणि किरकोळ स्टोअर्सवर $59.95 किंवा सुमारे ४६०० रुपयांना ठेवण्यात आली आहे. सध्या ते फक्त अमेरिकेत लॉन्च करण्यात आले आहे.

काय आहे या बाटलीत खास : आता ही पाण्याची बाटली स्मार्ट का आहे हे जाणून घेणंही खूप गरजेचं आहे. तुम्ही एका दिवसात किती पाणी किंवा द्रव पदार्थ घेत आहात याची काळजी ही बाटली घेईल . हे Apple Health सह समक्रमित केले जाऊ शकते. iPhones प्रमाणे, HidrateSpark देखील दोन प्रकारांमध्ये येतो. यापैकी एक HidrateSpark Pro आहे आणि दुसरा HidrateSpark Pro STEEL आहे. त्यांची किंमत अनुक्रमे $59.95 आणि $79.95 आहे.

आणखी वाचा : History Of Twitter: Apple मुळे Odeo फ्लॉप झाला, नंतर Twttr ची कल्पना आली जी शेवटी Twitter बनली

आणखी वाचा : Koo अ‍ॅपने अल्गोरिदम सार्वजनिक केले, असं करणारे पहिले सोशल मीडिया अ‍ॅप बनले, जाणून घ्या काय फायदा होईल?

HidrateSpark Pro STEEL दोन रंगात येते. एक चांदीचा आणि दुसरा काळा. यात तळाशी एक एलईडी सेन्सर आहे जो पाणी पिण्यासाठीची आठवण करून देतो. हे ब्लूटूथ कनेक्शनद्वारे Apple हेल्थला अलर्ट देखील करते.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gadgets news apple water bottle hidratespark launches know its price and features prp
First published on: 28-04-2022 at 21:56 IST