Gizmore ही एक भारतीय कंपनी आहे. ही कंपनी ब्लूटूथ स्पिकर्स, नेकबँड्स, स्मार्टवॉच अशा गॅजेट्सचे उत्पादन करते. याच कंपनीने आपले नवीन स्मार्टवॉच लॉन्च केले आहे. Gizmore Cloud असे त्या स्मार्टवॉचचे नाव आहे. या स्मार्टवॉचचे फीचर्स, किंमत जाणून घेऊयात.
Gizmore Cloud चे फिचर्स
Gizmor Cloud या स्मार्टवॉचमध्ये १. ८५ इंचाचा एचडी कर्व्ह डिस्प्ले वापरकर्त्यांना मिळतो. या वॉचमध्ये ५०० nits इतका ब्राईटनेस येतो. हे स्मार्टवॉच मेटल केसमध्ये येते. यामध्ये कॉलिंगचे फिचर देण्यात आले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्ही ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीने कॉलिंग करू शकणार आहात.
हेही वाचा : Tech Layoff मध्ये TCS च्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; नोकरी तर जाणार नाहीच पण…
Gizmore Cloud हे वॉटरप्रूफ असून यासाठी याला IP67 हे रेटिंग मिळाले आहे. याशिवाय यामध्ये mazon Alexa आणि Apple Siri या व्हॉइस असिस्टंटचा सपोर्ट देण्यात आला आहे. एकदा चार्ज केले की, Gizmore Cloud या स्मार्टवॉचची बॅटरी सात दिवस टिकते असा दावा कंपनीने केला आहे. Gizmore Cloud मध्ये अनलिमिटेड क्लाउड वॉच फेस उपलब्ध असणार आहेत. याशिवाय या वॉचमध्ये हार्ट रेट ट्रॅकर, स्लिप मॉनिटर, पिरियड ट्रॅक अमी हेल्थ फीचर्स म्हणून SpO2 देण्यात आला आहे.
Gizmore Cloud या स्मार्टवॉचची Flipkart वरून आज (२० फेब्रुवारी) पासून विक्री सुरु झाली आहे. हे तुम्ही आजपासून खरेदी करू शकणार आहात. या स्मार्टवॉचची मूळ किंमत १,६९९ रुपये असून फरमुळे तुम्ही हे १,१९९ रुपयांना खरेदी करू शकणार आहात.