scorecardresearch

Premium

आता iPhone 13 आणि iPhone 12 कमी किंमतीत खरेदी करण्याची सुवर्ण संधी; फक्त ‘या’ दिवसाची वाट पाहावी लागेल

फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल दरम्यान, आयफोन १३ आणि आयफोन १२ सीरिजचे फोन आतापर्यंतच्या सर्वात कमी किमतीत खरेदी केले जाऊ शकतात. २३ सप्टेंबरपासून Amazon चा सेल देखील सुरु होणार आहे.

Now a golden opportunity to buy iPhone 13 and iPhone 12 at low price
photo(financial express)

ॲप्पलने ७ सप्टेंबरला आपल्या नवीन सीरीजचे अनावरण केले होते. त्यात आयफोन १४ आणि आयफोन १४ प्रो हे नवीन फोन लाँच करण्यात आले होते. जर तुम्ही देखील आयफोनप्रेमी असाल आणि आयफोन खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न असेल. तर तुमचे स्वप्न आता पूर्ण होऊ शकते. होय, Flipkart Big Billion Days सेल दरम्यान, आयफोन १३ आणि आयफोन १२ आतापर्यंतच्या सर्वात कमी किमतीत खरेदी केले जाऊ शकतात.

फ्लिपकार्टवर सेल सुरू होणार आहे. या सेल दरम्यान, दोन जुन्या आयफोन स्मार्टफोनवर चांगली सूट मिळणार आहे, ही सूट किती असेल, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मने अद्याप याबद्दल सांगितले नाही, परंतु हे नक्कीच सांगितले गेले आहे की ते आयफोन १३ आणि आयफोन १२ वर आता पर्यंतची आकर्षित डील असेल.

ESIC Recruitment 2023
ESIC Recruitment 2023: पॅरामेडिकल आणि नर्सिंग स्टाफच्या पदांसाठी होणार बंपर भरती; ही आहे शेवटची तारीख
28% gst on online gaming
१ ऑक्टोबरपासून ऑनलाइन गेमिंग, कॅसिनो आणि हॉर्स रेसिंगवर २८ टक्के GST लावला जाणार : CBIC चेअरमन
iphone 13 mini massive discount on flipkart
iPhone 15 सिरीजच्या लॉन्चिंगआधी ‘हा’ आयफोन केवळ २४ हजारांमध्ये खरेदी करण्याची संधी, ऑफर्स एकदा पाहाच
WCL recruitment 2023
वेस्टर्न कोलफिल्डमध्ये ८७५ जागांसाठी होणार भरती, १०वी पास उमेदवार १६ सप्टेंबर पर्यंत करू शकतात अर्ज

( हे ही वाचा: Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलची तारीख झाली जाहीर; iPhone 13 सह अनेक वस्तू मिळतील अर्ध्या किंमतीत)

iPhone 11 देखील विक्रीसाठी उपलब्ध असेल

आयफोन १३ आणि आयफोन १२ व्यतिरिक्त, आयफोन ११ सारखे पर्याय देखील या Flipkart सेल दरम्यान उपलब्ध आहेत. दरवर्षी आपला लेटेस्ट आयफोन लाँच केल्यानंतर कंपनी जुन्या मॉडेल्सच्या किमतीत कपात करते आणि आता ही सूट अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणू शकते.

फ्लिपकार्टच्या विक्रीशिवाय, Amazon देखील भारतात सेल सुरू करणार आहे. ही दोन्ही विक्री २३ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या दरम्यान, Realme, Redmi, Samsung आणि Poco सारख्या ब्रँडचे स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळेल.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Golden opportunity to buy iphone 13 and iphone 12 at low price in india gps

First published on: 15-09-2022 at 14:36 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×