भारती एअरटेलने आपल्या ग्राहकांना एक खुशखबर दिली आहे. आता एअरटेल आपल्या प्रत्येक ग्राहकाला ५जीबी डेटा मोफत देणार आहे. ही बातमी ऐकल्यानंतर एअरटेलचे ग्राहक फारच खुश झाले आहेत. ही ऑफर मिळवण्यासाठी ग्राहकांना एक गोष्ट करावी लागणार आहे. तर एअरटेलचा ५जीबी डेटा मोफत मिळवण्यासाठी काय करावं लागेल, हे आज आपण जाणून घेऊया.

एअरटेल ही कंपनी आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या सेवा प्रदान करण्यासाठी प्रयत्नशील असते. एअरटेल थँक्स हे एअरटेलचे एक इकोसिस्टम अ‍ॅप्लिकेशन आहे जे वापरकर्त्यांना रिवॉर्ड्सचा दावा करण्यास, एअरटेल पेमेंट्स बँकेत प्रवेश करण्यास, त्यांची सध्याची बिले भरण्यास, योजना बदलण्यास आणि बऱ्याच गोष्टी करण्यास अनुमती देते. एअरटेलचा हा डेटा वापरकर्त्यांना तेव्हाच दिला जाईल जेव्हा ते एअरटेल थँक्स अ‍ॅप इंस्टॉल आणि लॉग इन करतील. वापरकर्त्यांना ५जीबी डेटा एकाचवेळी दिला जाणार नाही. त्याऐवजी, एअरटेल थँक्स अ‍ॅपवर प्रत्येकी १जीबीच्या पाच कूपनच्या स्वरूपात जमा केले जाईल.

एअरटेलची ५जीबी मोफत डेटाची ही ऑफर नवीन प्रीपेड कनेक्शन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिली जाणार आहे. यासाठी तुम्हाला फक्त नवीन एअरटेल कनेक्शन मिळवावे लागेल आणि एअरटेल थँक्स अ‍ॅप डाउनलोड करून तुमच्या एअरटेल नंबरवर नोंदणी करून लॉग इन करावे लागेल. यानंतर अ‍ॅपमधील माय कूपन विभागात जा आणि विनामूल्य डेटा कूपनचा दावा करा.

९० दिवसांच्या आत करावा लागणार दावा

एअरटेलने म्हटले आहे की अ‍ॅपमध्ये नवीन नंबरसह लॉग इन केल्यानंतर प्रत्येक नवीन वापरकर्ता कंपनीकडून प्रत्येकी १जीबीच्या पाच कूपन प्राप्त करण्यास पात्र असेल. वापरकर्त्यांना ९० दिवसांच्या आत डेटा व्हाउचरचा दावा करावा लागेल अन्यथा ते कालबाह्य होतील. नवीन प्रीपेड ग्राहकांसाठी ही एअरटेल थँक्स डाउनलोड ऑफर आहे.

रेफरल केल्यावर मिळणार १०० रुपये

एअरटेल वापरकर्ते प्रत्येक यशस्वी रेफरलवर १०० रुपयेदेखील कमवू शकतात. एअरटेल थँक्स अ‍ॅपवर जाऊन, वापरकर्ते त्यांच्या मित्राला एअरटेल प्रीपेड सिमची रेफरल लिंक पाठवू शकतात. जर वापरकर्त्याच्या मित्राने नवीन एअरटेल सिम खरेदी करण्यासाठी रेफरल लिंकवर क्लिक केले तर, वापरकर्ता आणि मित्र दोघांनाही भारती एअरटेलकडून १०० रुपये किमतीचे डिस्काउंट कूपन मिळतील. एअरटेल थँक्स अ‍ॅपवरून सेवा खरेदी करताना हे कूपन उपयोगी पडेल.