टिकटॉक (TikTok) भारतीय बाजारात परतण्याचा विचार करत आहे. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची मूळ कंपनी, बाईटडान्स (ByteDance) या क्षेत्रात पुन्हा प्रवेश करण्यासाठी भारतात नवीन भागीदार शोधत आहे. लोकप्रिय शॉर्ट व्हिडीओ शेअरिंग प्लॅटफॉर्मवर २०२० मध्ये भारत सरकारने बंदी घातली होती. सरकारने या बंदीसाठी राष्ट्रीय सुरक्षेचे कारण सांगितले आणि तेव्हापासून टिकटॉक भारतामध्ये उपलब्ध नाही.

परंतु या प्रकरणाशी संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार लवकरच यात बदल होऊ शकतो. अहवालानुसार, चीनी कंपनी हिरानंदानी समूहासोबत भागीदारीसंबंधी बोलणी करत आहे. हिरानंदानी समूह ही मुंबईस्थित कंपनी असून ती योट्टा इन्फ्रास्ट्रक्चर सोल्यूशन्स अंतर्गत डेटा सेंटर चालवते. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, या दोन्ही कंपन्यामध्ये सध्या चर्चा सुरू असून ती अंतिम टप्प्यात आहे.

इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या मागे CE लिहण्याचं कारण काय? जाणून घ्या

मात्र, केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांना या योजनांची माहिती अनौपचारिकपणे देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. याशिवाय एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने स्पष्ट केले, “आमच्याशी अद्याप कोणतीही औपचारिक चर्चा झालेली नाही. पण, आम्हाला योजनांची माहिती देण्यात आली आहे. जेव्हा ते आमच्याकडे मंजुरीसाठी येतील तेव्हा आम्ही याविषयी तपास करू.”

मेसेज सेंड झाल्यानंतरही करता येणार एडिट; जाणून घ्या WhatsApp चे नवे फीचर

वापरकर्त्यांच्या डेटाच्या स्टोरेजची अनिश्चितता हे भारतात टिकटॉकवर बंदी घालण्याचे एक महत्त्वाचे कारण होते. एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, “वापरकर्त्याचा महत्वपूर्ण डेटा भारताबाहेर स्टोर केला जाऊ नये.” सर्व अ‍ॅप्स आणि वेबसाइट्सनी स्थानिक पातळीवर डेटा साठवण्यासाठी तरतूद केली आहे किंवा त्यांच्या डेटा स्टोरेज आणि प्रक्रिया धोरणांमध्ये आवश्यक बदल करत आहेत. जर टिकटॉक परत आले तर त्यांनाही हे नियम पाळावे लागतील.