scorecardresearch

iPhone खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! Flipkart वरील ऑफरचा लाभ घ्या आणि १७,५०० रुपयांची बचत करा

Flipkart वरील ऑफरमुळे तुमची तब्बल १७५०० रुपयांची बचत होणार आहे

iPhone खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! Flipkart वरील ऑफरचा लाभ घ्या आणि १७,५०० रुपयांची बचत करा
ऑफरसह Flipkart ने तुम्हाला मोबाईल एक्सचेंजचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. (Photo: Indian Express)

तुम्हाला जर iPhone SE 3 खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी फ्लिपकार्टवर एक बंपर ऑफर सुरु आहे. ज्यामध्ये तुम्हाला स्वस्तात अॅपलचा स्मार्टफोन मिळू शकतो. फ्लिपकार्टवर सध्या ‘ब्लॅक फ्रायडे’ सेल सुरु आहे. यामध्ये तुम्हाला iPhone SE 3 हा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी एक्सचेंज आणि बँक ऑफर उपलब्ध आहेत. या ऑफरमुळे तुमची तब्बल १७,५०० रुपयांची बचत होणार आहे. त्यामुळे ही ऑफर ऑनलाईन मार्केटमधील स्मार्टफोनसाठीची सर्वात चांगली ऑफर असल्याचं बोललं जात आहे. चला तर ही ऑफर नेमकी काय आहे ते जाणून घेऊया.

64GB मेमरी असलेल्या iPhone SE 3 या स्मार्टफोनची Flipkart वर मूळ किंमत ४९,९०० रुपये आहे. मात्र, फ्लिपकार्टने त्याची किंमत कमी केल्यामुळे तुम्हाला हा मोबाईल केवळ ४७,९९० रुपयांमध्ये मिळू शकतो. मात्र, फ्लिपकार्ट केवळ या मोबाईलची किंमत कमी करुन थांबलं नाही. तर तुम्हाला हा फोन खरेदी करण्यासाठी आणखी काही आकर्षक ऑफर दिल्या आहेत.

हेही वाचा- ऐकावं ते नवलंच! एका वर्षापूर्वी समुद्रात पडला iphone, सापडल्यानंतर महिलेला धक्काच बसला, कारण…

त्यानुसार फ्लिपकार्टने तुम्हाला एक्सचेंजचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. या ऑफरमध्ये तुम्ही तुमच्याकडे असणारा जुना मोबाईल देऊन तुम्ही iPhone SE 3 मोबाईल खरेदीवर जवळपास १७,५०० रुपयांची सूट मिळवू शकता. मोबाईल एक्सचेंज ऑफर तुमच्यासाठी उपलब्ध आहे की नाही, हे पाहण्यासाठी तुम्हाला तुमचा पिन कोड नंबर टाकून तपासावं लागेल.

दरम्यान, मोबाईल एक्सचेंज डिस्काउंट हा तुमच्या मोबाईलवर अवलंबून आहे. कारण तुम्ही जो स्मार्टफोन एक्सचेंज करत आहात त्याचे मॉडेल आणि त्याची सध्याची कंडीशन कशी आहे, यावर तुम्हाला मिळणारा डिस्काउंट अवलंबून असणार आहे. शिवाय तुम्हाला फ्लिपकार्टच्या या दोन्ही ऑफरचा एकत्रित लाभ मिळाला तर ४९,९०० रुपयांचा iPhone SE 3 केवळ ३०,४९० रुपयात मिळेल. आयफोन SE 3 च्या इतर मॉडेलसाठी देखील ही ऑफर सुरु आहे. त्यानुसार 128GB चा iPhone SE 3 तुम्हाला ३५,४९० रुपयांना मिळू शकतो.

हेही वाचा- भारीचं! आता WhatsApp घेऊन आलाय तगडा फीचर, एका क्लिकमध्ये पाठवू शकता ‘इतक्या’ लोकांना मेसेज

बँक ऑफर –

फ्लिपकार्ट तुम्हाला एक्सचेंज ऑफरसह बँकेच्या ऑफर देखील देत आहे. ज्यामुळे तुमच्या पैशांची आणखी बचत होणार आहे. या आकर्षक ऑफर कोणकोणत्या आहेत ते जाणून घेऊयात. तुम्ही जर फेडरल बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे मोबाईल खरेदी केला तर तुम्हाला १० टक्के सूट मिळणार आहे. तर, Flipkart Axis Bank च्या क्रेडिट कार्डने व्यवहार केला तर तत्काळ 5 टक्क्यांची सूट मिळणार आहे. त्यामुळे वेळ न घालवता तुम्हाला जर स्वस्तात iPhone SE 3 खरेदी करायचा असेल तर फ्लिपकार्टच्या ऑफरचा लाभ घ्या.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या