जगप्रसिद्ध सर्च इंजिन कुठलं? असा प्रश्न विचारला तर कुणीही पटकन सांगेल गुगल. काहीही सर्च करायचं असेल तर गुगल.कॉमचा पर्याय जगात सगळेच लोक वापरतात. याच गुगलचा आज २५ वा वाढदिवस आहे. गुगल या जगप्रसिद्ध सर्च इंजिनला २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गुगलने एक खास डुडलही तयार केलं आहे. या डुडलवर क्लिक केलं की आपल्याला गुगल सर्च इंजिनची माहिती मिळते. आज आम्ही डुडलद्वारे गुगलचा २५ वा वाढदिवस साजरा करतो आहोत. वाढदिवस हे तुमचं वय दर्शवत असतात. मग आमचा जन्म कसा झाला हे तुम्हाला बघायचं असेल तर हे पेज नक्की पाहा असं म्हणत गुगल डुडलने पहिल्यांदा झळकलेल्या गुगल डुडलचा फोटो दिला आहे. २७ सप्टेंबर १९९८ ही गुगलची जन्मतारीख. याच दिवशी हे सर्च इंजिन सुरु झालं आणि या सर्च इंजिनची भुरळ सगळ्या जगाला पडली आहे. इंटरनेट सुरु झाल्यानंतर ते पुढे नेण्यात आणि वैविध्यपूर्ण माहिती देण्यात गुगल या सर्च इंजिनचा सिंहाचा वाटा आहे. Google Celebration १९९८ मध्ये कॅलिफोर्नियातील स्टॅनफोर्ड विद्यापीठातील लॅरी पेज आणि सेर्गेई ब्रिन या दोन विद्यार्थ्यांनी सप्टेंबर महिन्यात गुगलचा शोध लावला. प्रत्यक्षात गुगल ची सुरुवात एक रिचर्स प्रोजेक्ट म्हणून झाली होती. लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन यांनी Google.stanford.edu या एड्रेसवर इंटरनेट सर्च इंजिन तयार केले. तसेच लॅरी पेज आणि सेर्गेई ब्रिन यांनी अधिकृतपणे लाँच होण्यापूर्वी त्याला ‘बॅकरब’ असे नाव दिले. जे की नंतर गुगल केले गेले. यावेळी या दोन्ही विद्यार्थ्यानी त्यांच्या या सिस्टम चे नाव त्यांनी गुगल ठेवलं आणि गुगल हे जगातलं क्रमांक १ चं सर्च इंजिन म्हणून उदयास आलं आहे. Google.com डोमेन १५ सप्टेंबर १९९५ रोजी नोंदणीकृत होते. Google ४ सप्टेंबर १९९८ रोजी कंपनी म्हणून नोंदणीकृत केले होते. २७ सप्टेंबर १९९८ रोजी गुगल सर्च इंजिनवर रेकॉर्ड नंबर पेज सर्च केले गेले. तेव्हापासून गुगलचा वाढदिवस याच दिवशी साजरा केला जातो. गुगल आज जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन आहे. आज तुम्ही गुगलच्या माध्यमातून १०० पेक्षा जास्त भाषांमध्ये तुम्ही माहिती शोधून घेऊ शकता. सर्च इंजिन गुगल लॅपटॉप, कॉम्प्युटरसाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जाते.