जगभरात लोकप्रिय इंटरनेट ब्राउझर गुगल क्रोमचा लोगो आठ वर्षांनंतर बदलला आहे. आता तुम्हाला Google Chrome पूर्णपणे नवीन डिझाइनमध्ये दिसेल. यापूर्वी, कंपनीने २०१४ मध्ये क्रोमचे डिझाइन बदलले होते. मात्र यावेळी तुम्हाला क्रोममध्ये (Chrome New Logo) खूपच थोडा बदल दिसेल. ज्यानंतर क्रोम खूप खास आणि वेगळा दिसेल.

गूगल क्रोमचा नवीन लोगो दिसतो कसा?

गुगल क्रोमच्या नवीन लोगोबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला त्यात थोडा बदल दिसेल. जुन्या लोगोची ग्रीन सेंटर सीमेवर थोडी सावली होती, जी बदलानंतर काढून टाकण्यात आली आहे. नवीन लोगोमध्ये तुम्हाला लाल, पिवळे आणि हिरवे रंग अधिक स्पष्ट आणि सपाट दिसतील. मध्यभागी असलेला निळा रंग आता पूर्वीपेक्षा जास्त गडद दिसतो. Chrome मधील सर्व रंग आता पूर्वीपेक्षा गडद करण्यात आले आहेत.

story of farmer s son from sangli who successfully completed the mumbai london mumbai double bike journey
सफरनामा : दुचाकीवरून देशाटन
sun and jupiter conjunction in aries
१२वर्षांनंतर झाली सूर्य आणि गुरुची युती! या राशींचा सुरु होईल सुवर्णकाळ! मिळेल अमाप पैसा
sebi introduced t0 settlement plan for share buying and selling from today
शेअर खरेदी-विक्रीची ऐतिहासिक ‘टी प्लस शून्य’ प्रणाली आजपासून; स्टेट बँक, बजाज ऑटोसह २५ समभागांत एकाच दिवसांत व्यवहारपूर्तता शक्य  
Pavan Davuluri
मायक्रोसॉफ्टची धुरा भारतीय वंशाच्या पवन दावुलुरी यांच्या हाती; जाणून घ्या त्यांची कारकीर्द?

डिझायनर एल्विन हूने क्रोमच्या नवीन लोगोबद्दल ट्विट करून माहिती शेअर केली आहे. ज्यामध्ये नवीन लोगोची अनेक झलक दाखवण्यात आली आहे. एल्विन हू यांनी ट्विटमध्ये लिहिले की, ‘गुगल क्रोमच्या कॅनरी आवृत्तीच्या अपडेटमध्ये तुमच्यापैकी काहींना आज नवीन लोगो दिसला असेल. तसेच आम्ही आठ वर्षांत प्रथमच Google Chrome चे ब्रँड आयकॉन बदलत आहोत. नवीन लोगो लवकरच तुमच्या डिव्हाइसवर दिसण्यास सुरुवात होईल.

आम्ही तुम्हाला सांगतो की सध्या हा नवीन लोगो फक्त गुगल क्रोमच्या कॅनरी व्हर्जनवरच दिसतो, पण लवकरच हा बदल गुगल क्रोमच्या स्टँडर्ड व्हर्जनवरही दिसेल. गुगल क्रोमच्या नवीन लोगोमध्ये कोणतीही सावली नाही. यामध्ये वापरलेले रंग अधिक उजळ असून त्यांचे प्रमाणही वेगळे आहे. क्रोमच्या जुन्या लोगोच्या तुलनेत नवीन लोगोमध्ये मध्यभागी निळे वर्तुळ मोठे करण्यात आले आहे. नवीन लोगो उपकरणानुसार सानुकूलित करण्यात आला आहे. Google Chrome च्या १०० आवृत्तीसह नवीन लोगो सर्व उपकरणांवर लवकरच दिसणार आहे.

क्रेडिट कार्डच्या लेट पेमेंटवर कोणत्या बँका किती आकारतात शुल्क? जाणून घ्या

लोगोमधील बदलामुळे सोशल मीडियावर नेटिझन्सच्या प्रतिक्रिया

लोगोमधील बदलामुळे सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. कारण जुन्या आणि नवीन लोगोमधील फरक लक्षात येत नाही असे नेटिझन्सचे मत आहे.