Google Meet : Google हे आजच्या काळात प्रत्येकजण वापरतो. गुगलचे महत्व आपल्या आयुष्यात मोठ्या प्रमाणात आहे. याच गुगल अमेरिकन कंपनीने काही महिन्यांपूर्वी Google Meet मध्ये स्लाईड्स प्रेझेंट करण्यासाठी एक फिचर लाँच केले होते. ज्यामुळे युजर्स एकमेकांना स्लाईड्स दाखवून संवाद साधू शकत होते. आता गुगलने स्पीकर नोट्स नावाचे फिचर अनेक हे ज्यमुळे युजर्सना अधिक फायदा होणार आहे.

युजर्स गुगल मीटवर स्लाईड प्रेझेंट करत असताना समोरच्या व्यक्तीला स्पीकर नोट्स दाखवण्यासाठी स्लाईड कंट्रोल बारमधील स्पीकर नोट्स या बटनावर क्लिक करू शकतात. यामध्ये कोणाचेही नियंत्रण नसणार आहे तर वैयक्तिक गुगल अकाउंट आणि ऑफिस अकाउंट असणाऱ्या युजर्ससाठी हे उपलब्ध नसणार आहे. हे फिचर फक्त गुगल वर्कस्पेस बिझनेस स्टॅंडर्ड, बिझनेस प्लस, एंटरप्राइज स्टॅंडर्ड, एज्युकेशन स्टॅंडर्ड , एज्युकेशन प्लस यासाठी हे फिचर उपलब्ध असणार आहे.

Mahindra Bolero Neo Plus SUV launch
Force Citiline, Gurkha 5-door विसरुन जाल! टोयोटानंतर आता महिंद्राने देशात दाखल केली ९ सीटर SUV कार, किंमत…
Israel use of AI in war revealed in reports by Israeli and Palestinian journalists
इस्रायलकडून युद्धात ‘एआय’चा वापर? इस्रायली आणि पॅलेस्टिनी पत्रकारांच्या अहवालात खुलासा
TCS Recruitment 2024
TCSमध्ये होणार पदवीधर उमेदवारांची भरती, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख अन् प्रक्रिया
Indian youth abroad
भारतीय तरुणांना परदेशात डांबून ठेवणाऱ्यांना अटक

हेही वाचा : Amazon Republic Day Sale: तीन हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायत भन्नाट फीचर्स असणारी ‘ही’ स्मार्टवॉच; जाणून घ्या

काय आहे गुगल मीट ?

गुगल मीट हे माध्यम गुगलने तयार केले आहे. कोरोनाच्या काळात या माध्यमच सर्वात जास्त वापर झाला. गुगल मीटमुळे तुम्ही एकमेकांशी व्हिडीओद्वारे संवाद साधू शकता. मात्र हे वापरण्यासाठी तुमच्याकडे गुगलवर अकाउंट असणे आवश्यक आहे.