Google Feature Detect Spam Calls : स्पॅम कॉल्स किंवा अनावश्यक कॉल्समुळे अनेक मोबाइलधारकांना त्रास होतो. असे कॉल्स कामात व्यत्यय आणतात. त्यांना ओळखण्यासाठी गुगल आपल्या व्हॉइस सेवेसाठी नवीन फीचर उपलब्ध करत आहे. हे फीचर फोन रिसिव्ह करणाऱ्यांसाठी संशयित स्पॅम कॉल ओळखेल. गुरुवारी कंपनीने आपल्या अधिकृत ब्लॉगवर याबाबत माहिती दिली.

अनावश्यक कॉल्स आणि संभाव्य हानीकारक घोटाळ्यांपासून संरक्षण करण्यात मदत करण्यासाठी, गुगल अशा सर्व कॉल्सवर सस्पेक्टेड स्पॅम कॉलर लेबल लावतो ज्यास गुगल स्पॅम मानतो. गुगल आर्टिफिशियल इंटेलिजेन्सचा वापर करून हे काम करतो. हेच आर्टिफिशियल इंटेलिजेन्स गुगलच्या कॉलिंग इकोसिस्टिमवर दर महिन्याला कोट्यवधी स्पॅम कॉल्स ओळखते, असे कंपनीने सांगितले.

printed receipts toxic body experts stop you must not touch those printed receipts heres why
खरेदीनंतर मिळणाऱ्या पावतीला स्पर्श करणे आरोग्यासाठी ठरतेय घातक? डॉक्टर काय सांगतात? वाचा
how to make fish egg omelette Fish egg recipe in marathi
झटपट नाश्त्यासाठी बनवा “माशाच्या अंड्याचे ऑमलेट” लहान मुलंही खातील आवडीने
Vote From Home Eligibility and Procedure for Lok Sabha Election 2024 in Marathi
Vote From Home: घरबसल्या मतदान करण्यासाठी कोण पात्र? त्यासाठीचा फॉर्म 12D नेमका कसा भरायचा? जाणून घ्या
How To Identify Mangoes Without Adulteration Five Signs
गोड, रसाळ आंबा निवडताना ‘या’ खुणांकडे असू द्या नजर; तज्ज्ञांनी सांगितली भेसळ ओळखण्याची योग्य पद्धत

(Aadhaar तपशील ‘असा’ करा सुरक्षित, गैरवापर टाळण्यात होईल मदत)

स्पॅम डिटेक्शन फॅसिलिटीचे फायदे

कंपनीनुसार, क्रमांक स्पॅम असल्यास भविष्यात त्या संपर्क क्रमांकावरून येणारे कॉल्स थेट व्हॉइसमेलमध्ये जातील आणि त्या क्रमांकातील हिस्ट्री एन्ट्री स्पॅम फोल्डरमध्ये जातील. जर कॉल स्पॅम नसल्यास तो क्रमांक नॉट स्पॅम म्हणून मार्क करता येईल आणि त्या क्रमांकावर लेबल दिसून येणार नाही. गुगल सर्व व्हॉइस युजर्ससाठी हे फीचर उपलब्ध करत आहे.

(तुम्ही ऑनलाइन आहात हे कुणालाही कळणार नाही, ‘असे’ लपवा Whatsapp Online Status)

गुगल व्हॉइस

गुगल व्हॉइस मार्च २००९ मध्ये लाँच झाले होते. व्हॉइस युजरला यूएस टेलिफोन क्रमांक प्रदान करते, जो निवडलेल्या एरिया कोड्समधील उपलब्ध क्रमांकातून तो निवडतो. निवड मोफत असून अशा युजरला केलेले कॉल युजरने त्याच्या गुगल अकाउंट वेबपोर्टलमध्ये कॉन्फिगर केलेल्या टेलिफोन क्रमांकावर पाठवले जातात.