Google I/O 2023 Program Updates , 10 May 2023: आज Google चा वर्षातील सर्वात मोठा i/o इव्हेंट होणार आहे. यंदाचा गुगलचा हा इव्हेंट एकदम खास असणार आहे. कारण कंपनी यामध्ये पहिल्या पिक्सल फोल्ड हा पहिला फोल्डिंग स्मार्टफोन लॅान्च करणार आहे. तसेच तुम्हाला यामध्ये Pixel 7a चे अधिकृत लॉन्चिंग पाहायला मिळणार आहे. जो लवकरच भारतात देखील येणार आहे.

Live Updates

Google i/o 2023 Program : गुगल त्याच्या AI चॅटबॉट Bard बद्दल देणार माहिती 

22:56 (IST) 10 May 2023

आज गुगल या इव्हेंटमध्ये Bardमध्ये एकत्रित करण्यासाठी Gmail आणि Docx साठी आणखी दोन प्रक्रिया सुरु करत आहे. ज्यामुळे बार्डच्या प्रतिक्रिया पाठवणे सोपे होणार आहे.

22:53 (IST) 10 May 2023

भविष्यात येणारे AI मॉडेल 'जेमिनी' हे अधिक प्रगत AI मॉडेल असणार आहे. AI चा वापर करून वॉटरमार्किंग आणि मेटा-डेटा टेक्नॉलॉजी अधिकी सक्षम होणार आहे.

22:50 (IST) 10 May 2023

PaLM2 हे सुरक्षेसाठी असणारे धोके शोधण्यासाठी AI चा वापर करते. हे फाईन ट्युनिंग वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना मदत करते. तसेच हे कोडर्सना देखील मदत करणार आहे.

22:47 (IST) 10 May 2023
AI ची आता डॉक्टर्सना होणार मदत

AI इंटरप्रिंट हे आता डॉक्टरांनादेखील मदत करणार आहे. एक्स -रे आणि इतर रिपोर्ट किंवा टेस्टमधील फोटोज समजून घेण्यासाठी AI डॉक्टरांना मदत करणार आहे.

22:43 (IST) 10 May 2023

लवकरच Google मॅप्स मध्ये वातावरणाचे लेटेस्ट अपडेट वापरकर्त्यांना पाहता येणार आहेत. AQI फिचर लवकरच गुगल मॅप्सवर लॉन्च होणार आहे.

22:40 (IST) 10 May 2023

गुगलमध्ये वापरकर्त्यांना आता त्यांना हवा तसा एडिट करता येणार आहे. कारण आता गुगलने मॅजिक एडिटर फिचर लॉन्च केले आहे।

22:36 (IST) 10 May 2023

22:34 (IST) 10 May 2023

या इव्हेंटमध्ये AI हे केंद्रस्थानी असणार आहे. म्हणजेच गुगल त्याच्या AI bard बद्दल अधिक माहिती देणार आहे.

22:18 (IST) 10 May 2023

Google I/O इव्हेंट अवघ्या काही मिनिटांमध्ये सुरु होणार आहे. इव्हेंट सुरु होण्यापूर्वी सीईओ सुंदर पिचाई यांनी थेथे लोकांच्या जमलेल्या गर्दीचा फोटो ट्विट केला आहे.

22:14 (IST) 10 May 2023

22:12 (IST) 10 May 2023
Google I/O 2023 मध्ये नवीन AI डेव्हलपमेंट

गुगल सध्याच्या काळामध्ये Microsoft आणि OpenAI ने लॉन्च केलेल्या AI चॅटजीपीटीशी स्पर्धा करण्याच्या प्रयत्नांमध्ये आहे. जेव्हापासून OpenAI ने ChatGPT लॉन्च केले तेव्हापासून गुगलची चिंता वाढली आहे.

22:08 (IST) 10 May 2023

22:03 (IST) 10 May 2023
Google Pixel 7a चा प्रोमो व्हिडीओ लीक

OnLeaks या सोर्सद्वारे जारी करण्यात आलेल्या अधिकृत प्रोमो व्हिडिओमध्ये Google चा आगामी बजेट स्मार्टफोन Pixel 7a बद्दल सांगण्यात आले आहे. लॉन्चिंगआधीच त्याचा प्रोमो व्हिडीओ लीक झाला आहे.

21:59 (IST) 10 May 2023

21:54 (IST) 10 May 2023
बहुप्रतिक्षित फोल्डेबल स्मार्टफोन होणार लॉन्च

Pixel Fold या फोल्डेबल फोनमध्ये तुम्हाला ७.६७ इंचाचा स्क्रीन मिळू शकतो. तसेच हा फोन फोल्ड केला असता त्याच्या डिस्प्लेची साईझ ५.७९ इंच होतो. गुगलचा फोल्डेबल फोनचा डिस्प्ले सॅमसंगच्या फोल्डेबल स्मार्टफोनच्या तुलनेत लहान होतो. या डिव्हाईसची विक्री जून २०२३ मध्ये सुरु होण्याची अपेक्षा आहे.

21:48 (IST) 10 May 2023

21:45 (IST) 10 May 2023
Pixel Buds

गुगलच्या या इव्हेंटमध्ये Pixel Buds Pro किंवा Pixel Buds ची नवीन सिरिज लॅान्च होऊ शकते. Google I/O 2022 गुगलने Pixel Buds Pro सादर केले होते. जुलै २०२२ मध्ये कंपनीने याचे भारतात लॉन्चिंग केले होते.

21:41 (IST) 10 May 2023
Google I/O इव्हेंट २०२३ कधी आणि कुठे पाहता येणार ?

Google I/O 2023 हा इव्हेंट माउंटन व्ह्यू (कॅलिफोर्निया) मधील शोरलाइन अ‍ॅम्फीथिएटरमध्ये होणार आहे. म्हणजेच हा इव्हेंट यंदा भौतिकरित्या होणार आहे. मात्र फॅन्स मुख्य भाषण मोफत लाईव्ह पाहू शकणार आहेत. याचे लाईव्ह स्ट्रीमिंग हे कंपनीच्या अधिकृत YouTube हँडलवर होणार आहे. Google I/O कीनोट रात्री १०.३० वाजल्यापासून सुरु होणार आहे. त्यानंतर डेव्हलपर केंद्रित कीनोट होणार आहे.

21:33 (IST) 10 May 2023
Google I/O Event चे १५ वे वर्ष

गुगलच्या या इव्हेंटची सुरुवात मे २००६ रोजी झाली. यावेळी केवळ १०० लोक उपस्थित होती. Google च्या माउंटन व्ह्यू कॅम्पसमधील Googleplex हे इव्हेंटचे ठिकाण होते. २०२० मध्ये करोनामुळे हा इव्हेंट होऊ शकला नाही.

21:29 (IST) 10 May 2023
Google Pixel 7a ची अपेक्षित किंमत

Google चा बहुप्रतिक्षित स्मार्टफोन Google Pixel 7a लॉन्च होण्याआधीच त्याच्या किंमत लीक झाली आहे. Google Pixel 7a ची किंमत Pixel 6a पेक्षा जास्त आहे. कंपनीने Google Pixel 7a ची किंमत ७४९ सिंगापूर डॉलर्स ठेवली असून ज्याची किंमत भारतामध्ये ४६,००० रुपये असण्याची शक्यता आहे.

21:24 (IST) 10 May 2023
Android 14 सह नवीन फीचर्स बघायला मिळण्याची शक्यता

अँड्रॉइड १४ जरी मार्चमध्ये रोलआऊट झाले असले तरी देखील टेक्नॉलॉजी क्षेत्र त्याची पूर्ण सिरीज येण्याची वाट बघत आहे. या इव्हेंटमध्ये Android 14 सह काही नवीन फीचर्स बघायला मिळतील अशी अपेक्षा आहे. तसेच वापरकर्त्यांची गोपनीयता आणि सुरक्षिततेमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे.

21:21 (IST) 10 May 2023
Pixel 7a गुगलसाठी ठरणार गेमचेंजर

Pixel 7a हा मिड-बजेट असणारा स्मार्टफोन कंपनीसाठी गेमचेंजर ठरू शकतो. सध्या या सेगमेंटमध्ये सॅमसंग, ओप्पो आणि वनप्लसचे वर्चस्व पाहायला मिळते. गुगलच्या या फोनची किंमत साधरणतः ४५,००० रुपये असण्याची शक्यता आहे.

21:17 (IST) 10 May 2023

गुगल या कार्यक्रमामध्ये अँड्रॉइड १४ ला बीटा टेस्टर्ससाठी लॉन्च करू शकते. काही महिन्यांनी हे सर्व अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी रोलआऊट करण्यात येणार आहे. अँड्रॉइड १४ मध्ये मिळणाऱ्या अनेक नवीन फीचर्सची माहिती या इव्हेंटमध्ये दिली जाणार आहे. ज्यामध्ये सर्वात खास ‘Back Gesture’ हे फिचर असणार आहे.

21:15 (IST) 10 May 2023

Google या इव्हेंटमध्ये Pixel 7a, पिक्सेल फोल्ड आणि पिक्सेल टॅबलेट अधिकृतपणे लॉन्च करणार आहे. त्यातील काही प्रॉडक्ट्स ११ मे पासून भारतात विक्रीसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

21:06 (IST) 10 May 2023
Google I/O 2023 सुरू होण्यासाठी उरले फक्त काही तास

गुगलच्या या इव्हेंटमध्ये सुरुवातीला सीईओ सुंदर पिचाई यांचे भाषण होणार आहे. त्यांचे भाषण 10AM PT पर्यंत सुरू होणे अपेक्षित आहे. सुंदर पिचाई AI,LLMS आणि कंपनीच्या प्रॉडक्ट्स आणि सेवांबद्दल बोलण्याची शक्यता आहे.

Google I/O 2023 हा इव्हेंट माउंटन व्ह्यू (कॅलिफोर्निया) मधील शोरलाइन अ‍ॅम्फीथिएटरमध्ये होणार आहे.