कोणाला कोणत्याही प्रकारची माहिती मिळवायची असल्यास ते सर्वप्रथम गुगलची (Goggle)म दत घेतात. गुगल या सर्च इंजिनची (Search Engine) सुरुवात ४ सप्टेंबर १९९८ रोजी झाली. अल्फाबेट या कंपनीच्या अंतर्गत गुगलचा समावेश होतो. गुगलची भारत ही मोठी बाजारपेठ आहे. हजारो वापरकर्ते याचा वापर करतात. याच Google चा यंदाचा वार्षिक इव्हेंट हा Google I/O १० मे म्हणजे उद्या होणार आहे.

गुगलचा हा इव्हेंट १० मे म्हणजे उद्या होणार आहे. या इव्हेंटमध्ये गुगल आपली अनेक डिव्हाईस आणि अपडेट्स लॉन्च करू शकते. या वर्षी गुगल अनेक गॅजेट्स आणि अपडेट्ससह सज्ज आहे. या वर्षी कंपनी Pixel 7a आणि Pixel Fold स्मार्टफोन आणि Pixel Tablet लॉन्च करू शकते. तसेच याशिवाय Android 14 चे ऑफिशियल इंट्रोडक्शन, पिक्सल टॅबलेटसह Pixel 8 सिरीज देखील लॉन्च करू शकते. तर हा इव्हेंट तुम्ही Live कुठे, कसा आणि केव्हा पाहू शकता त्याबद्दल जाणून घेऊयात.

Air India Air Transport Services Limited jobs 2024
AIATSL recruitment 2024 : एअर इंडिया एअर ट्रान्स्पोर्ट सर्व्हिसेसमध्ये मोठी भरती; पाहा नोकरीची माहिती….
a young boy denied entry to bank of India branch for wearing shorts video goes viral
Nagpur Video: हा कोणता नियम! शॉर्ट पॅन्टमुळे बँकेत No Entry; नागपूरच्या तरुणाचा व्हिडीओ होतोय व्हायरल..
world's first self-driven electric
एप्रिल फुल नव्हे, खरचं चालकाशिवाय धावतेय ही दुचाकी! भाविश अग्रवालने केली Ola Soloची घोषणा, पाहा Video
Air India Air Transport Services jobs 2024
AIATSL recruitment 2024 : एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेसमध्ये मोठी भरती! ‘या’ पदांवर होणार भरती

हेही वाचा : Twitter युजर्ससाठी मोठी बातमी! लवकरच ‘ही’ अकाउंट्स होणार बंद, लॉग इन करा अन्यथा…

Google I/O इव्हेंट २०२३ कधी आणि कुठे पाहता येणार ?

google चा हा इव्हेंट १० मे म्हणजे उद्या सकाळी माउंटन व्ह्यू (कॅलिफोर्निया) मधील शोरलाइन अ‍ॅम्फीथिएटरमध्ये 10AM PT (भारतीय वेळेनुसार रात्री १०.३० वाजता) सुरु होणार आहे. हा इव्हेंट कंपनीच्या अधिकृत YouTube हँडलवरून थेट प्रसारित केला जाणार आहे.

Android 14 

गुगल या कार्यक्रमामध्ये अँन्ड्रॉईड १४ ला बीटा टेस्टर्ससाठी लॉन्च करू शकते. काही महिन्यांनी हे सर्व अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी रोलआऊट करण्यात येणार आहे. अँड्रॉइड १४ मध्ये मिळणाऱ्या अनेक नवीन फीचर्सची माहिती या इव्हेंटमध्ये दिली जाणार आहे. ज्यामध्ये सर्वात खास ‘Back Gesture’ हे फिचर असणार आहे.

AI Bard

गुगलच्या या इव्हेंटमध्ये AI bard देखील सादर केले जाणार आहे. कंपनी याबद्दल या इव्हेंटमध्ये अधिकची माहिती वापरकर्त्यांना आणि ग्राहकांना देऊ शकते.

हेही वाचा : VIDEO: ‘या’ दिवशी होणार Google चा सर्वात मोठा इव्हेंट, Android 14 सह लॉन्च होणार…; जाणून घ्या

Pixel Fold

Pixel Fold या फोल्डेबल फोनमध्ये तुम्हाला ७.६७ इंचाचा स्क्रीन मिळू शकतो. तसेच हा फोन फोल्ड केला असता त्याच्या डिस्प्लेची साईझ ५.७९ इंच होतो. गुगलचा फोल्डेबल फोनचा डिस्प्ले सॅमसंगच्या फोल्डेबल स्मार्टफोनच्या तुलनेत लहान होतो.

Pixel 7a

Google Pixel 7a च्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये वापरकर्त्यांना Tensor G2 प्रोसेसरसह ६.१ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले ऑफर केले जाऊ शकतो. ज्याचा रिफ्रेश रेट हा ९० Hz इतका असू शकतो. इतकेच नव्हे तर ग्राहकांना यामध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. ज्यामध्ये प्रायमरी हा ६४ मेगापिक्सलचा कॅमेरा असू शकतो. त्याशिवाय १२ मेगापिक्सल अल्ट्रा वाईड लेन्स आणि सेल्फी व व्हिडिओसाठी १३ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाऊ शकतो.

Google चा बहुप्रतिक्षित स्मार्टफोन Google Pixel 7a लॉन्च होण्याआधीच त्याच्या किंमती लीक झाली आहे. Google Pixel 7a लाँच करण्यापूर्वी, एक रिटेल बॉक्स प्रत्यक्षात सिंगापूरमधील एका रिटेलरकडे आला होता आणि त्याच रिटेलरने तो सर्वांसोबत शेअर केला आहे. Google Pixel 7a ची किंमत Pixel 6a पेक्षा जास्त आहे. माहितीनुसार, कंपनीने Google Pixel 7a ची किंमत ७४९ सिंगापूर डॉलर्स ठेवली असून ज्याची किंमत भारतामध्ये ४६,००० रुपये असण्याची शक्यता आहे.