काल रात्री Google चा या वर्षातील सर्वात मोठा इव्हेंट पार पडला. इव्हेंटची सुरुवात सीईओ सुंदर पिचाई यांच्या भाषणाने झाली. गुगलने या इव्हेंटमध्ये आपले AI Bard देखील लॉन्च केले आहे. कंपनीने ही घोषणा केली, Bard चॅटबॉट हा १८० देशांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. तसेच उर्वरित देशांमध्ये लवकरच बार्ड सुरु गुगलने सांगितले आहे. या इव्हेंट दरम्यान टेक दिग्गज गुगलने आपले अत्याधुनिक भाषा मॉडेल PaLM 2 द्वारे समर्थित २५ नवीन गुगल प्रॉडक्ट आणि फीचर्सची घोषणा केली आहे. गुगल बार्ड हे फेब्रुवारीमध्ये लॉन्च करण्यात आले होते. बार्डकडे ChatGpt चा स्पर्धक म्हणून पहिले जाते.गुगलने आपले Ai Bard हे

Google Bard आता भारतातही उपलब्ध

Google चा AI चॅटबॉट आता सर्वांसाठी सुरू झाले असून आता भारतात पण गुगल बार्डचा वापर करता येणार आहे. बार्ड आता भारतासह १८० पेक्षा जास्त देशांमध्ये उपलब्ध आहे. तथापि, जर का तुम्ही बार्ड वापरत असाल, तर तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की हा AI चॅटबॉट अजूनही प्रायोगिक टप्प्यात आहे. Google ने “Bard चुकीची किंवा आक्षेपार्ह माहिती प्रदर्शित करू शकते जी Google च्या दृश्यांचे प्रतिनिधित्व करत नाही” अशी माहिती देखील दिली आहे.

bmc, mumbai municipal corporation, Undertake Rs 209 Crore Drainage Project, Prevent Flooding, Andheri Subway, milan subway, bmc drainage project, mumbai monsoon, mumbai waterlogging, mumbai news,
अंधेरी सब वे पूरमुक्त करण्यासाठी आणखी २०९ कोटी, किमान तीन वर्षे लागणार
use molds 40 years ago on manufacturers for sugar gathi Pune
साखर गाठीसाठी नवे साचे मिळेनात; उत्पादकांवर ४० वर्षांपूर्वीचे साचे वापरण्याची वेळ
Use coco peat to flower your home garden
घरातील बाग फुलवण्यासाठी वापरा कोकोपीट, घरच्या घरी कसे तयार करावे कोकोपीट
ed recruitment 2024 sarkari naukri officer job in ed full form needs qualification apply enforcement directorate gov in
ED Sarkari Job: ईडीमध्ये ऑफिसर होण्याची सुवर्णसंधी! फक्त ही पात्रता आहे आवश्यक, मिळू शकतो १,५१,००० पर्यंत पगार

हेही वाचा : National Technology Day: तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला ५८०० कोटींच्या प्रकल्पांचा शुभारंभ, जाणून घ्या…

सध्या वापरकर्त्यांना एआय बार्डमध्ये इंग्रजी, जपानी आणि कोरियन या तीनच भाषांचा सपोर्ट मिळणार आहे. लवकरच याला अन्य भाषांचा देखील सपोर्ट मिळणार आहे. हा इव्हेंट होण्यापूर्वी गुगल बार्डबाबत जगभरामध्ये अनेक प्रकारच्या चर्चा सुरु होत्या. या इव्हेंटमध्ये AI bard बाबत कंपनीने अधिकच्या विस्तृतपणे माहिती दिली आहे. AI BARD हा गुगलचा चॅटबॉट आहे. त्याच्या मधील खास फीचर्सबद्दल जाणून घेऊयात.

BARD ला १८० देशांमध्ये लॉन्च करण्यात आले आहे. यामध्ये सध्या ३ भाषांचा सपोर्ट असणार आहे. मात्र लवकरच याला ४० भाषांचा समोरच्या मिळणार आहे. AI आधारित Bard चॅटबॉट पूर्णपणे सुरक्षित असणार आहे. यामध्ये व्हिज्युअलचाही सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच गुगल बार्डमध्ये लवकरच हिंदी, बांगला आणि फारसी या भाषांचा सपोर्ट देण्यात येणार आहे.

हेही वाचा : Google I/O 2023: गुगलने केली AI ‘Bard’ ची घोषणा; १८० देशांमध्ये ‘या’ भाषांच्या सपोर्टसह मिळणार सेवा, जाणून घ्या फीचर्स

भारतात AI बार्ड मोफत कसे वापरावे?

१. सर्वात पहिल्यांदा ज्यांना बार्ड वापरायचे आहे त्यांनी बार्डच्या अधिकृत वेबसाइट https://bard.google.com वर क्लिक करावे.
२. वरील लिंकवर क्लिक केल्यावर पेजच्या खाली उजव्या बाजूला असलेल्या ‘Try Me’ पर्यायावर क्लिक करावे.
३. त्यानंतर पेजच्या खाली असलेल्या ‘I Agree’ वर क्लिक करावे. त्यानंतर Google बार्ड ची प्रायव्हसी पॉलिसी तुम्हाला Agree करावे .
४. त्यानंतर तुम्ही गुगल Bard कहा मोफत वापर करू शकता.