काल रात्री Google I/O इव्हेंट पार पडला. यामध्ये गुगलने अनेक नवीन प्रॉडक्ट्स लॉन्च केले आहेत. Google ने या वर्षाच्या सुरुवातीला फेब्रुवारी महिन्यामध्ये ndroid 14 चे पहिले पहिले डेव्हलपर पूर्वावलोकन बिल्ड लॉन्च केले होते. त्यांनतर काल Google I/O नंतर गुगलने पिक्सल डिव्हाईससाठी Android 14 Beta 2 रोलआऊट केले आहे. तर अँड्रॉइड १४ मध्ये कोणकोणते फीचर्स मिळणार आहेत. त्याब्ब्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

Android 14 मध्ये मिळणार नवीन फीचर्स

लॉक स्क्रीनसाठी वापरकर्त्यांना अनेक कस्टमायझेशनचा पर्याय, जनरेटिव्ह AI वॉलपेपर्स, enhanced widget customization, फाईंड माय डिव्हाईसला एक मोठे अपडेट मिळणार आहे. तसेच ईमोजी वॉलपेपरसह तुम्हाला अनेक फीचर्स मिळणार आहेत.

Dead ants found in samosas
किळसवाणा प्रकार! कुरकुरीत समोस्यामध्ये आढळल्या मेलेल्या मुंग्या; दिल्ली विद्यापीठाच्या कॅन्टीनमधील Video Viral
Railway Bharti 2024
Railway Bharti 2024 : रेल्वेमध्ये टेक्निशियनच्या ९००० पेक्षा अधिक पदासाठी होणार भरती, आजच करा अर्ज
two women fighting for seats in Delhi bus shocking video goes viral on social media
‘सीट’वरून दोन महिलांमध्ये तुफान राडा, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, VIDEO होतोय व्हायरल
Viral Video of Mother's Phone Addiction
बापरे! मोबाईलच्या नादात महिलेने चिमुकल्याला फ्रिजमध्ये ठेवले? व्हायरल व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा

हेही वाचा : Google I/O 2023: आता डिजिटल वॉचमध्ये देखील वापरता येणार WhatsApp, महत्त्वाचे अपडेट्स जाणून घ्या एका क्लिकवर

वापरकर्ते त्यांचे डिव्हाईस अत्यंत चांगल्या प्रकारे वापरू शकावेत म्हणून Android 14 सह Google चा मुख्य फोकस हा accessibility फीचर्सवर असणार आहे. Android 14 मध्ये वापरकर्त्यांचा अनुभव सुधारण्यासाठी अनेक नवीन फीचर्स जोडण्यात आली आहेत. जसे की यामध्ये तुम्हाला नोटिफिकेशन फ्लॅश हा पर्याय मिळणार आहे. जसे तुम्हाला एखादे नोटिफिकेशन येईल तसे लगेचच रिअर कॅमेऱ्यामध्ये फ्लॅश आणि फ्रंट डिस्प्ले मध्ये फ्लॅश वापरकर्त्यांना दिसणार आहे. तसेच तुम्ही तुमच्या आवडीनुसार डिस्प्ले फ्लॅशचा रंग निवडू शकता.

नवीन ऑपरेटिंग सिस्टीम अँड्रॉइड १४ सह वापरकर्त्यांना improved grammatical इन्फ्लेक्शन API मिळणार आहे. जे जर्मन आणि फ्रेंचसह अनेक भाषांसाठी चांगला सपोर्ट देणार आहे. थर्ड पार्टी डेव्हलपर्स देखील वेगवेगळ्या क्षेत्रासह App ची भाषा कस्टमाइज करू शकणार आहेत.