Google Pixel 7a स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. या फोनला काल झालेल्या गुगलच्या I/O 2023 या इव्हेंटमध्ये सादर करण्यात आले होते. . Pixel 7a गुगलच्या A-सिरीज अंतर्गत सादर करण्यात आला आहे. तर कालच लॉन्च झालेल्या या फोनची किंमत काय आहे तसेच त्यामध्ये फीचर्स काय असणार याबद्दल माहिती जाणून घेऊयात.

Google Pixel 7a  चे फीचर्स

Google Pixel 7a या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला ६.१ इंचाचा फुल एचडी + OLED डिस्प्ले मिळणार आहे. याचा रिफ्रेश रेट ९०Hz इतका असणार आहे. या फोनच्या स्क्रीनवर कॉर्निंग गोरिला ग्लास ३ चे प्रोटेक्शन देण्यात आले आहे. यामध्ये HDR सपोर्ट देण्यात आला आहे. सेफ्टीसाठी फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला असून, ते डिस्प्लेमध्येच देण्यात आले आहे. तसेच या फोनमध्ये ८ जीबी रॅम अनुच्या १२८ जीबी स्टोरेज देण्यात आला आहे.

russian soldier
‘रशियात अडकलेल्या २० भारतीयांच्या सुटकेसाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न’, परराष्ट्र खात्याची माहिती
Selection of two players from the police disha program for the national football tournament Pune news
गुन्हेगारी मार्गावर भरकटलेल्या मुलांना मिळाली ‘दिशा’; पोलिसांच्या दिशा उपक्रमातील दोन खेळाडूंची राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड
dubai five year multiple entry visa
विश्लेषण : दुबईने भारतीय पर्यटकांना पाच वर्षांसाठी ‘मल्टीपल एंट्री व्हिजा’ देण्याची घोषणा का केली? याचा भारतीयांना कसा फायदा होईल?
Leica working On Leica look For Xiaomi 14 series for smartphones iconic camera
‘या’ कंपनीच्या स्मार्टफोन्समध्ये दिला जाणार Leica चा आयकॉनिक कॅमेरा; पाहा काय असणार खास

हेही वाचा : Google I/O 2023 मध्ये लॉन्च झाले Android 14; जाणून घ्या कोणत्या स्मार्टफोनमध्ये करता येणार डाउनलोड?

Google Pixel 7a मध्ये कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये Wi-Fi, Bluetooth v5.3 आणि NFC सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच या फोनमध्ये ४३८५ mAh बॅटरी देण्यात आली आहे. गुगलने पहिल्यांदाच पिक्सेल ७ ए ला वायरलेस चार्जिंग दिले आहे. यामध्ये Qi चार्जिंग स्टॅंडर्डचा सपोर्ट देण्यात आला आहे. Pixel 7a मध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) सह ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. यामध्ये दुसरा सेन्सर हा अल्ट्रा वाईड अँगलसह येतो ज्यात १३ मेगापिक्सलचा सेन्सर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी १३ मेगापिक्सलचा वापरकर्त्यांना मिळणार आहे.

काय आहे Google Pixel 7a ची भारतातील किंमत ?

Pixel 7a फोनची भारतामध्ये किंमत ही ४३,९९९ रुपये इतकी आहे. ही किंमत या फोनच्या ८ /१२८ जीबी स्टोरेज असणाऱ्या मॉडेलची आहे. ११ मे म्हणजे आजपासून Flipkart वर याची विक्री सुरू झाली आहे. जर का तुम्ही hdfc बँकेचे कार्डचा वापर केला तर तुम्हाला ४ हजार रुपयांचा इन्स्टंट डिस्काऊंट मिळू शकतो. या ऑफरनंतर या फोनची किंमत ही ३९,९९९ रुपये होऊ शकते. हा फोन तुम्ही Charcoal, Snow आणि Sea Colors या तीन रंगांमध्ये खरेदी करू शकता.