आर्थिक मंदीचा फटका बसत असल्याने खर्च कमी करण्यासाठी अनेक दिग्गज टेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांची कपात करत आहेत. आतापर्यंत अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. काही कंपन्यांनी दोन वेळा कर्मचारी कपात केली आहे. Google मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात टाळेबंदी करण्यात आली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुगलने १२,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. गुगलच्या कर्मचारी कपातीच्या निर्णयाच्या विरोधात स्वित्झर्लंडच्या झुरिच इथल्या ऑफिसमधून २५० कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे वॉकआऊट केले आहे. तसेच कंपनीने आणखी कपात करू नये अशी विनंती या कर्मचाऱ्यांनी केली आहे.

हेही वाचा : Foxcon कंपनीला प्रथमच मिळाली Airpods ची ऑर्डर; भारतातील ‘या’ राज्यात करणार तब्बल १६०० कोटींची गुंतवणूक

अमेरिका आणि कॅनडामधील google च्या प्रभावित कर्मचाऱ्यांना याबद्दल माहिती देण्यात आली आहे. मात्र बाकीच्या ठिकाणांहून किती कर्मचाऱ्यांना कमी केले जाईल याची अधिकृत आकडेवारी समोर आलेली नाही. ज्यांची नोकरी आधीच संपली आहे तसेच मोठ्या प्रमाणात झालेला google layoffs या विरोधात अशा सहकाऱ्यांसह असेलेली एकता दाखवण्यासाठी हा वॉकआऊट करण्यात आला आहे. यासंबंधीचे वृत्त बिझनेस टुडेने दिले आहे.

आम्ही Googlers एकमेकांसोबत उभे आहोत. स्पष्ट आर्थिक गरजेशिवाय मोठ्या प्रमाणात आम्हाला कर्मचारी कपात मान्य नाही असे सिंडीकॉमला ज्ञात असलेल्या Google कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे. सिंडीकॉम ही आयटी क्षेत्रातील स्विस ट्रेंड युनियन आहे आणि तिचे झुरीच येथे मोठ्या प्रमाणात सदस्य आहेत. कंपनीने कर्मचाऱ्यांशी संवाद साधावा आणि कर्मचारी कपातीच्या पर्यायांची कसून तपासणी व्हावी अशी मागणी गुगल झुरिच येथील कर्मचाऱ्यांनी केली आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Google layoffs 250 employees walk out in protest against employee layoffs tech layoff news tmb 01
First published on: 16-03-2023 at 16:42 IST