Google ला मोठा झटका; नवीन एआय 'Bard'ने चुकीची माहिती दिल्यामुळे गमावले १०० अब्ज डॉलर| google lost 100 billion dollars due to wrong answer to ai bard chatbot in paris event | Loksatta

Video: Google ला मोठा झटका; नवीन एआय ‘Bard’ने केलेल्या ‘या’ चुकीमुळे गमावले १०० अब्ज डॉलर्स

Google ची पॅरेंट कंपनी अल्फाबेटच्या शेअर्समध्ये बुधवारी मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे.

Alphabet 0 billion Loss
Google Bard – (Image Credit- Google)

Alphabet $100 billion Loss: OpenAI कंपनीने आपला ChatGpt हा चॅटबॉट लॉन्च केल्यानंतर Google चे टेन्शन वाढले होते. कारण ChatGpt हे सध्याच्या काळात सध्या खूप चर्चेत असलेला विषय आहे. चॅटजीपीटीला स्पर्धा करण्यासाठी गुगलने देखील लवकरच AI BARD लॉन्च करणार असल्याची घोषणा केली आहे. याच चॅटबॉटचा एक इव्हेंट पॅरिसमध्ये पार पडला. मात्र या इव्हेंटमुळे Google ची पॅरेंट कंपनी अल्फाबेटच्या शेअर्समध्ये बुधवारी मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. अल्फाबेटच्या शेअर्समध्ये ८ टक्क्यांपेक्षा जास्त घसरण झाली आहे.

गुगलची पॅरेंट कंपनी असणाऱ्या अल्फाबेटच्या शेअरमध्ये घसरण झाल्यामुळे कंपनीला १०० अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे.पॅरिसमध्ये झालेल्या इव्हेंटमध्ये Googleच्या AI बार्डला एका व्यक्तीने विचारले की, “जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपमधील कोणत्या नवीन शोधांबद्दल मी माझ्या ९ वर्षांच्या मुलास सांगू शकतो? या प्रश्नावर बार्ड लगेचच दोन उत्तरे बरोबर देतो. मात्र त्याने दिलेले शेवटचे ऊत्तर हे चुकीचे होते. ऊत्तर देताना बार्डने सांगितले की, टेलिस्कोपने आपल्या सौरमालेबाहेरील ग्रहाचे फोटो घेतले. मात्र खरेतर नासाच्या रिपोर्टनुसार एक्सोप्लॅनेटचे पहिले फोटो हे युरोपियन दक्षिणी वेधशाळेतील खूप मोठ्या टेलिस्कोपद्वारे घेण्यात आले होते. त्यामुळेच या इव्हेंटच्या दरम्यान अल्फाबेटच्या शेअर्समध्ये घसरण झाली

हेही वाचा : गुगलला विसरून जा! ChatGPT सह Microsoft लवकरच लॉन्च करणार New Bing आणि Edge ब्राउझर

गुगलच्या शेअर्समध्ये ८.१ टक्क्यांची घसरण होऊन ९८.९१ वरती शेअर्स स्थिर झाले. या सगळ्या घटनांमध्ये मायक्रोसॉफ्टच्या शेअरमध्ये किरकोळ वाढ झालेली पाह्यला मिळाली.मायक्रोसॉफ्ट हे OpenAI मध्ये प्रमुख भागधारक आहे. मायक्रोसॉफ्टने २३ जानेवारी रोजी OpenAI मध्ये अब्जावधी डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. नक्की किती गुंतवणूक करणार हे जाहीर करण्यास कंपनीने नकार दिला होता.

गुगलने बार्ड नावाच्या आपल्या नवीन AI चॅटबॉटची प्रसिद्धी करण्यासाठी पॅरिसमध्ये एक इव्हेंट आयोजित करण्यात आला होता. याच्या आधी एक दिवस मायक्रोसॉफ्टने आपल्या नवीन Bing सर्च इंजिनची नवीन सिरीज लॉन्च करण्यासाठी एक इव्हेंटमध्ये आयोजित केला होता. गुगलने अधिकृतपणे बार्ड लवकरच सुरु करणार असल्याचे गुरुवारी स्पष्ट केले.

हेही वाचा : गुगलला विसरून जा! ChatGPT सह Microsoft लवकरच लॉन्च करणार New Bing आणि Edge ब्राउझर

बुधवारी झालेल्या इव्हेंटमध्ये जो परिसमधून प्रदर्शित करण्यात आला होता. गुगलच्या अधिकाऱ्यांनी बार्डच्या काही क्षमतांवर चर्चा केली. सादरीकरणामध्ये इलेक्ट्रिक कार विकत घेण्याचे फायदे व तोटे दाखवण्यासाठी कसा बार्डचा उपयोग केला जाऊ शकतो हे दाखवण्यात आले.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-02-2023 at 10:09 IST
Next Story
Twitter Down: जगभरात ट्विटर Down? हजारो वापरकर्त्यांना लॉग इन करताना येतेय अडचण