स्मार्टफोनच्या जगतामध्ये गूगल मॅप्सला खूपच महत्त्व प्राप्त झाले आहे. एकप्रकारे हे आपल्या जेवणाचा एक भागच बनले आहे. कुठेही जायचे असल्यास आपण गुगल मॅप्स उघडून ती जागा शोधण्याचा प्रयत्न करतो. परंतु जर हे अ‍ॅप डाउन झाले तर किती त्रास होईल? असेच काहीसे गुरुवारी रात्री घडले. गुरुवारी १७ मार्चला रात्री साडे नऊच्या आसपास गुगल मॅप्स हे अ‍ॅप क्रॅश झाले.

डाउन डिटेक्टर या वेबसाइटने शुक्रवारी संध्याकाळी या संबंधी एक अहवाल प्रसिद्ध केला. यात म्हटले होते की गुरुवारी रात्री गुगल मॅप्स हे अ‍ॅप डाउन झाल्यामुळे हजारो वापरकर्त्यांना हे अ‍ॅप वापरता येत नव्हते. यासंदर्भात गुगल मॅप्सच्या वेबसाइटनेही एक निवेदन जारी करून सर्व्हरमध्ये त्रुटी असल्याचे सांगितले.

A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची अखेरची धडपड
Taiwan Earthquake
Taiwan Earthquake : भूकंपाची चाहूल लागताच कुत्र्याने घरातल्या लोकांना केले सावध, तैवान येथील भूकंपाचा व्हिडीओ व्हायरल

ऑनलाइन डेटिंग अ‍ॅप्सवर अशाप्रकारे होऊ शकते तुमची फसवणूक; वेळीच व्हा सावध

या बातमीनंतर वापरकर्ते मात्र नाराज झाले आहेत. यादरम्यान, वापरकर्त्यांना अ‍ॅपल मॅपचा वापर करावा लागला. एका वापरकर्त्याने ट्विट करून लिहले की, मी एका ठिकाणी जात असतानाच अचानक गुगल मॅप बंद झाले. परंतु सुदैवाने माझ्याकडे अ‍ॅपल मॅप असल्याने माझा नाहक त्रास वाचला.

या घटनेनंतर भारतामध्ये गुगल मॅपसाठी पर्याय उपलब्ध करणे अधिक महत्त्वाचे ठरले आहे. जेणेकरून भविष्यात असे प्रसंग टाळता येतील आणि सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागणार नाही. गुगल मॅप्स हे भारतातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या अ‍ॅप्सपैकी एक आहे.