आपल्यापैकी अनेकजण अँड्रॉइड फोन हरवला किंवा चोरीला गेला तर तो शोधण्यासाठी गुगलचे ‘फाइंड माई डिव्हाइस’ (Find My Device) हे फिचर वापरतात. मात्र, हे फिचर वापरताना आपल्याला इंटरनेटची गरज भासते. जर इंटरनेट नसेल तर हे फिचर काम करत नाही. मात्र, गुगलकडून आता त्यांच्या या सेवेत लवकरच बदल केला जाणार आहे. त्यानंतर तुमचा हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल इंटरनेटशी कनेक्ट नसतानाही सापडू शकणार आहे.

हेही वाचा- तुमचं Instagram Chatting कुणीतरी वाचतय? घाबरू नका, ‘असं’ ठेवा इन्स्टाग्राम चॅटिंग सुरक्षित

World Art Day Art and Income Source in Marathi
पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल; पण कलेशी केलेली मैत्री…आयुष्य समृद्ध करणाऱ्या कलेमुळे तुमच्या करिअरला मिळू शकते नवी दिशा
UFO spotted during solar eclipse viral video
सूर्यग्रहण लागताना आकाशात दिसले ‘UFO’? व्हिडीओत कैद झालेले दृश्य पाहा; तुम्हीही व्हाल चकित
Video Make 50 Rice Papad With 1 Cup Cooked Rice Recipe
एक वाटी उरलेल्या भाताचे ५० पळी पापड करून तर पाहा; १५ मिनिटांची रेसिपी आणि चव तर अहाहा, पाहा Video
Kitchen Jugaad how to use lemon to Clean gas
Kitchen Jugaad: गॅसवर लिंबू टाकताच होईल कमाल, पाहा भन्नाट किचन जुगाड व्हिडीओ

या अॅपमध्ये नवीन “प्रायव्हसी सेंट्रिक फ्रेमवर्क” आहे जो एनक्रिप्टेड शेवटच्या लोकेशन रिपोर्टला सपोर्ट करतो. ज्यामुळे हरवलेल्या स्मार्टफोन शोधण्यास मदत होते. याशिवाय, हरवलेले WearOS डिव्हाइसदेखील शोधले जाऊ शकतात. परंतु कंपनीने हे फीचर अद्याप जारी केलेले नाही. या फिचरमध्ये गुगल प्ले सेवा v50.22 च्या सुरक्षा सुधारणेचा भाग आहे.

हेही वाचा- १ जानेवारीपासून बदलणार Online Payment, Google Chrome सुविधा; जाणून घ्या मुख्य ३ बदल

फाइंड माई डिव्हाइस फीचरसोबत कंपनीने गुगल वॉलेट आणि गुगल प्ले स्टोरमध्ये नवीन फीचर्सदेखील जोडली आहेत. गुगल प्ले स्टोरमच्या नवीन अपडेटमध्ये, गुगल प्लेद्वारे ब्राउझ करताना तुम्ही अनेक अॅप्स आणि गेमच्या इंस्टॉलेशनची प्रोग्रेस पाहू शकता. याशिवाय, जर तुमच्या फोनमध्ये कमी जागा असेल तरीदेखील तुम्ही हे अॅप्स आपोआप संग्रहित करू शकणार आहोत. शिवाय तुमचा डेटाही सेव्ह केला केला जाणार आहे.

हेही वाचा- वाहन चालकांसाठी MapMyIndia घेऊन आलय ‘जंक्शन व्ह्यू’ नावाचं भन्नाट फीचर; जाणून घ्या त्याचे फायदे

गुगलने २०२१ मध्ये फाइंड माई डिव्हाइस फीचरवर काम करायला सुरुवात केली होती. अॅपलमध्येही फाइंड माय नेटवर्क नावाचे फिचर आहे ते देखील हरवलेले iPhones, iPads, Macbooks आणि AirTag ट्रॅकर्स सहजपणे शोधण्यास मदत करते. ही उपकरणे वायफाय आणि ब्लूटूथ नेटवर्कच्या बाहेर असताना आणि बंद असताना शोधता येतात.