Google Pay या अ‍ॅपमुळे व्यवहार सुरळीत होण्यास मदत झाली आहे. सुट्ट्या पैशांच्या कटकटीतून तर कायमची सुटका झाली. रिक्षा, छोटे दुकानदार, भाजीवाले यांना क्यूआर कोडच्या माध्यमातून पैसे देता येतात. त्यामुळे हल्ली सर्वच कामं चुटकीसरशी होऊ लागली आहेत. या माध्यमातून केवळ पैसेच नाही तर इतरही कामं केली जातात. नुकतंच या माध्यमातून सोन्याची ऑनलाइन खरेदी विक्री करता येईल, अशी माहिती गुगल पेनं पेजवर दिली होती. आता गुगल पेनं १ लाख रुपयांपर्यंत कर्ज झटपट देण्यची सुविधा सुरु केली आहे. या माध्यमातून १ लाखापर्यंत कर्ज घेता येणार आहे. यासाठी गुगल पेनं डीएमआय फायनान्स लिमिटेडसोबत करार केला आहे. या करारानुसार दोन्ही कंपन्या डिजिटल वैयक्तिक कर्ज (Personal Loan)लोन देणार आहे.

गुगल पेच्या माध्यमातून आपल्याला १ लाखापर्यंत वैयक्तिक कर्ज डिजिटिली पद्धतीने मिळू शकते. हे कर्ज फेडण्यासाठी ३६ महिन्यांचा अवधी दिला जाणार आहे. सध्या डीएमआय फायनान्स लिमिटेडच्या भागीदारीसह देशातील १५ हजार पिन कोड्सवर ही सुविधा उपलब्ध होईल. यासाठी ग्राहकांकडे गुगल पे असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर क्रेडिट हिस्ट्री देखील चांगली असणं आवश्यक आहे, तेव्हाच हे कर्ज मिळणार आहे. पूर्व-पात्र वापरकर्ते हे कर्ज डीएमआय फायनान्स लिमिटेडकडून घेऊ शकतील. हे कर्ज गुगल पेद्वारे ऑफर केले जाईल.

Maharashtra Board Class 10th and 12th Result 2024 Date Time in Marathi
१०वी १२वीच्या निकालासंदर्भात मोठी बातमी! ‘या’ तारखेला निकाल लागण्याची शक्यता; कसा पाहाल? जाणून घ्या
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
byju s shuts 30 out of 292 tuition centres for cost cutting
बायजूच्या ३० शिकवणी केंद्रांना टाळे; खर्चात कपात करण्यासाठी कंपनीने उचलले पाऊल
tuberculosis tb patients marathi news, pm narendra modi tb medicines marathi news
औषधांच्या तुटवड्यासंदर्भात क्षयरुग्णांचे पंतप्रधानांना पत्र

बँकांनी ग्राहकाभिमुख बनून कर्जवाटप वाढवावे – अर्थमंत्री

ग्राहकाला कर्ज पूर्व मंजूर असेल तर कर्जाच्या अर्जावर रिअल टाइममध्ये प्रक्रिया केली जाईल. काही वेळातच तुम्ही अर्ज केलेल्या खात्यात एक लाख रुपये जमा होतील.