Google Pixel 7 आणि Pixel 7 Pro ला लाँच करण्यात आले आहे. न्यूयॉर्कमध्ये आयोजित कंपनीच्या Made By Google इव्हेंट दरम्यान Google ने Pixel 7 आणि Pixel 7 Pro सादर केला आहे. गुगलच्या या इव्हेंटमध्ये अनेक प्रोडक्ट्स लाँच केले गेले आहेत. या इव्हेंटमध्ये स्मार्टफोन, स्मार्टवॉच आणि अन्य दुसरे प्रोडक्ट्स सुद्धा लाँच केले गेले आहेत. Google Pixel 7 सीरीजमध्ये समाविष्ट असलेले हे दोन्ही फोन भारतातही सादर करण्यात आले आहेत. यावर प्री-ऑर्डर ऑफर्सही दिल्या जात आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुगल पिक्सेल वॉच, कंपनीचे पहिले स्मार्टवॉच तसेच पिक्सेल टॅबलेट देखील प्रदर्शित केले गेले आहेत. पिक्सेल वॉच काही फिटबिट वैशिष्ट्यांसह येते, ज्यामध्ये हार्ट-रेट ट्रॅकिंग समाविष्ट आहे. चला या सर्वांचे स्पेसिफिकेशन जाणून घेऊया.

Google Pixel 7 चे स्पेसिफिकेशन

डिस्प्ले – ६.३ इंच FHD+ OLED
रिफ्रेश रेट- ९०Hz
रॅम – ८ जीबी
स्टोरेज- १२ जीबी
ऑपरेटिंग सिस्टम- अँड्रॉइड १३
प्रोसेसर- Google Tensor G2 चिपसेट
मागील कॅमेरा – ५०MP मुख्य + १२MP अल्ट्रावाइड
फ्रंट कॅमेरा – १०.८MP सेल्फी शूटर
बॅटरी – ३०W जलद चार्जिंगसह ४,३५५mAh

आणखी वाचा : एअरटेलचा ‘हा’ रिचार्ज प्लॅन परवडणारा; वर्षभराच्या वैधतेसह मिळेल बरचं काही… 

Google Pixel 7 Pro चे स्पेसिफिकेशन

डिस्प्ले – ६.७-इंच QHD+ OLED LTPO
रिफ्रेश रेट- १२०Hz
रॅम – ८ जीबी
स्टोरेज- १२ जीबी
ऑपरेटिंग सिस्टम- अँड्रॉइड १३
प्रोसेसर- Google Tensor G2 चिपसेट
मागील कॅमेरा – ५०MP मुख्य + १२MP अल्ट्रा वाइड अँगल + ४८MP टेलिफोटो सेन्सर
फ्रंट कॅमेरा – १०.८MP सेल्फी शूटर
बॅटरी – ३०W जलद चार्जिंगसह ५,००mAh

Google Pixel 7 आणि Pixel 7 Pro किंमत

Google Pixel 7 आणि Pixel 7 Pro भारतात लॉन्च झाले आहेत. Pixel 7 ची किंमत ५९,९९९ रुपये आहे. यात स्नो, ऑब्सिडियन आणि लेमनग्रास असे तीन रंग पर्याय आहेत. त्याच वेळी, Pixel 7 Pro ची किंमत ८४,९९९ रुपये आहे. हेझल, ऑब्सिडियन आणि स्नो या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये ते उपलब्ध आहे.

Google Pixel 7 आणि Pixel 7 Pro प्री-ऑर्डर ऑफर

Google Pixel 7 आणि Pixel 7 Pro १३ ऑक्टोबरपासून भारतात विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जातील. तथापि, ते प्री-बुकिंग केले जाऊ शकते. या दोन्ही फोनवर मर्यादित वेळेची प्री-ऑर्डर दिली जात आहे. तुम्ही Flipkart वरून Pixel 7 प्री-बुक केल्यास, तुम्हाला ६ हजार रुपयांचा कॅशबॅक मिळेल. त्याच वेळी, Pixel 7 Pro प्री-बुकिंगवर, तुम्हाला ८,५०० रुपयांचा कॅशबॅक लाभ मिळेल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Google pixel 7 launch highlights pdb
First published on: 07-10-2022 at 09:52 IST