Google pixel 7a स्मार्टफोनबाबत एक नवीन माहिती लिक झाली आहे. टिप्सटर ऑनलिक्सनुसार, पिक्सेल ७ ए हा फोन पिक्सेल ७ सिरीजमधील फोन्स सारखाच दिसण्याची शक्यता आहे. परंतु, त्यामध्ये तळाशी किंचित जाड बेझेल आणि मोठी हनुवटी मिळू शकते. पिक्सेल ७ ए मध्ये नवीनच लाँच झालेले जी २ चिपसेट मिळू शकते. फोन प्लास्टिक फिनिशसह सादर केला जाऊ शकतो, ऑनलिक्सने केलेल्या ट्विटनुसार, पिक्सेल ७ ए हा फोन पिक्सेल ६ ए स्मार्टफोनच्या तुलनेत किंचित जाड असू शकतो. या महिन्याच्या सुरुवातीला Kuba Wojciechowski नावाच्या टिपस्टरनेही या फोनबाबत काही खुलासे केले होते. https://twitter.com/OnLeaks/status/1597632531654127616?s=20&t=ZU5QTLgKnKWIpzQjWbRL8A (शाओमीने Mi 11 Lite च्या किंमतीत केली कपात, १० हजारांची बचत, ६४ एमपी कॅमेऱ्यासह मिळतंय बरंच काही) टिपस्टर कुबानुसार, पिक्सेल ७ ए स्मार्टफोनमध्ये ९० हर्ट्झ स्क्रिन आणि सोनी आयएमएक्स ७८७ आणि सोनी आयएमएक्स १२ सेन्सरसह नवीन ड्युअल कॅमेरा सेटअप असेल. या फोनमध्ये ५ वॉट वायरलेस चार्जिंग फीचर मिळण्याची देखील शक्यता आहे. https://twitter.com/Za_Raczke/status/1591176262944706560?s=20&t=Y6ErSP8Kq6A6w0yWv7wuNw काही महिन्यांपूर्वी लाँच केले होते पिक्सेल ७ आणि पिक्सेल ७ प्रो काही महिन्यांपूर्वी गुगलने पिक्सेल ७ आणि पिक्सेल ७ प्रो स्मार्टफोन लाँच केले होते. या स्मार्टफोन्समध्ये अडथळारहित कार्य होण्यासाठी टेन्सर जी २ चिपसेट देण्यात आले आहे. दोन्ही फोन्स अँड्रॉइड १३ वर चालतात. कंपनीने या फोन्समध्ये क्लिअर कॉलिंग, गाइडेड फ्रेम आणि इतर काही विशिष्ट फीचर्स दिले आहत. आता कंपनी ग्राहकांसाठी पिक्सेल ७ ए उपलब्ध करण्याची शक्यता आहे. या फोनबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.