हल्ली बाजारामध्ये रोज नवनवीन टेक्नॉलॉजी लाँच होत असते. मग ती स्मार्टफोन्समध्ये असेल किंवा लॅपटॉप, स्मार्टवॉचमध्ये . यामध्ये रोज काहीतरी बदल होत असतात. Apple वॉच प्रमाणेच आता Google Pixel Watch मध्ये सुद्धा आता एक लोकांच्या फायद्याचे असणारे फिचर आणले आहे. या फीचरमुळे लोकांना आता काळजी करण्याचे काहीच कारण नसणार आहे.

गुगलने शेवटी आपल्या पहिल्या स्मार्टवॉच गुगल पिक्सेल वॉचसाठी अपडेट जारी केले आहे. ज्याची वापरकर्ते खुप काळापासून वाट बघत होते. तरीही Google ने अद्याप या फीचरविषयी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. Google Pixel Watch च्या वापरकर्त्यांना आता फॉल डिटेक्शनचे अपडेट मिळत आहेत.

lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची स्थिती कात्रीत अडकल्यासारखी
How much added sugar does your Favorited packet
तुमच्या आवडत्या चिप्समध्ये साखरेचे प्रमाण किती असते? ते कसे ओळखावे घ्या जाणून…
The Vietnam War Guided Missiles chip cold wars
संविधानभान: सकारात्मक भेदभाव म्हणजे काय?
Bacchu kadu and navneet rana
“मोठे भाऊही म्हणता, माफीही मागता, तुमच्या एवढा लाचार माणूस…”; बच्चू कडूंची रवी राणांवर बोचरी टीका

हेही वाचा : AMOLED डिस्प्ले, ४ जी कनेक्टसह Realme चा ‘हा’ फोन होणार लाँच; जाणून घ्या आणखी खासियत

गुगलने हे फॉल डिटेक्शन फिचर हिवाळ्यात मध्ये लाँच केले जाईल असे सांगितले होते. हे फिचर म्हणजे इमर्जन्सी कॉल सेवा आहे. या वॉचचा वापरकर्ता कुठेही पडला तर हे फॉल डिटेक्शन फिचर ऑटोमॅटिक सुरु होते. त्यानंतर हे फिचर इमर्जन्सी नंबरवर कॉल करते. गूगलच्या अहवालानुसार हे अपडेट डिसेंबरच्या अपडेटसहच आले आहे. अपडेट केल्यानंतर सेटिंगमधील सेफ्टी आणि इतर फीचर्स पाहता येतील.

हेही वाचा : Redmi Note 12 सिरीज झाली भारतात लाँच; पावरफुल कॅमेरासहित ‘हे’ मिळणार तगडे फीचर्स

अपघाताच्या वेळी जर वापरकर्त्याच्या हातात Google Pixel वॉच असेल, तर तो आपत्कालीन कॉल करेल। तथापि वापरकर्त्यांना कॉल करण्यापूर्वी त्याची सुचना देखील मिळेल. जेव्हा तुमचे घड्याळ वाय-फाय नेटवर्क किंवा LTE नेटवर्कशी कनेक्ट केलेले असेल तेव्हाच हे फीचर काम करेल.