Google Chrome चा वापर मोठ्या प्रमाणात होतो. ऑफिस, शाळा, किंवा तुमच्या वैयक्तिक कामासाठी क्रोमचा वापर होतो. यावर आपल्याला ज्या विषयाबद्दल माहिती हवी असते त्याची माहिती मिळवता येते. मात्र आता करून वापरणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गुगलने क्रोममध्ये दोन नवीन फीचर्स आणले आहेत. या फीचर्समुळे वापरकर्त्यांना मोठा फायदा होणार आहे. गुगलने आणलेले हे फीचर्स कोणते व त्यांचा वापरकर्त्यांना कसा फायदा होणार आहे हे आपण जाणून घेऊयात.

गुगल क्रोममध्ये Google ने दोन फीचर्स आणली आहेत. ज्यामुळे तुमची बॅटरी आणि मेमरी सेव्ह होऊ शकणार आहे. क्रोममध्ये गुगलने एनर्जी आणि मेमरी सेव्हर मोड हे फिचर आणले आहे. हे अपडेट तुम्हाला विंडो, मॅक, क्रोम OS आणि linux साठी देण्यात आले आहेत.

Maharashtra Board Class 10th and 12th Result 2024 Date Time in Marathi
१०वी १२वीच्या निकालासंदर्भात मोठी बातमी! ‘या’ तारखेला निकाल लागण्याची शक्यता; कसा पाहाल? जाणून घ्या
How To Identify Mangoes Without Adulteration Five Signs
गोड, रसाळ आंबा निवडताना ‘या’ खुणांकडे असू द्या नजर; तज्ज्ञांनी सांगितली भेसळ ओळखण्याची योग्य पद्धत
Google maps using AI new updates
आत Google map सुद्धा वापरणार AI! पाहा अॅपमधील ३ बदल; जाणून घ्या काय आहेत नवीन फीचर्स….
readers reaction on loksatta editorial
लोकमानस : आता कोठे हरवली भाजपची नैतिकता?

हेही वाचा : Vivo चा ‘हा’ स्मार्टफोन बदलणार सरड्यासारखा रंग, विश्वास बसत नसेल तर Video बघाच

परफॉर्मन्स टॅबमध्ये तुम्हाला Google Chrome ची दोन दिसतील. गुगल क्रोमचे मेमरी सेव्हर फिचर मेमरीमधून निष्क्रिय टॅब्सबद्दलची माहिती डिलीट करते. ज्यावर तुम्ही काम करत आहात तेवढ्याच टॅब्सची माहिती हे फिचर क्रोममध्ये चालू ठेवते. नवीन फिचर वापरकर्त्यांना मन्युअली वेबसाईट कनेक्ट करण्याची परवानगी देते जिथे त्यांना मेमरी सेव्हर सुरु ठेवायचे आहे.

तसेच तुम्हाला क्रोमच्या परफॉर्मन्स टॅबमध्ये Energy saver हे फिचर देखील मिळणार आहे. तुम्ही क्रोम वापरत असताना हे फीचर ऑन केले की, ते तुमच्या डिव्हाइसच्या बॅटरीचा कमीत कमी वापर करेल. हे फिचर सुरु होताच बॅकग्राऊंड अ‍ॅक्टिव्हिटी, अ‍ॅनिमेशन आणि व्हिडीओ फ्रेम व स्मूथ स्क्रोलिंग हे बंद होतात. ज्यामुळे बॅटरीचा कमीत कमी वापर होतो. तुमची सिस्टीम चार्ज होत नसेल तेव्हा आणि तुमच्या सिस्टीमची बॅटरी २० टक्क्यापर्यंत कमी होईल तेव्हा तुम्ही हे फिचर सूर करू शकता. या दोन्हीपैकी कोणताही पर्याय निवडला की chrome हे एनर्जी सेव्हर मोड फिचर आपोआप सुरु करेल.

हेही वाचा : Google Layoffs: गुगलने ४५३ भारतीयांना कामावरून काढलं, सुंदर पिचाई म्हणाले…

Google Chrome चे हे नवीन अपडेट Chrome V110 वर आले असून कंपनी हे अपडेट टप्प्याटप्प्याने आणत आहे. त्यामुळे नवीन अपडेट काही वापरकर्त्यांना दिसत नाही आहे.