google will offer 100 gbps broadband service in us | Loksatta

५ जीचाही वेग ओलांडणार ‘ही’ कंपनी, १०० जीबीपीएस ब्रॉडबँड स्पीड देण्याची योजना

कालच भारतात ५ जी सेवेचा शुभारंभ झाला आहे. ५ जी ही ४ जी पेक्षा १० पट अधिक गतिमान असल्याचे सांगितले जाते. तसेच ते २० जीबी पर्यंतची उच्चतम स्पिड देत असल्याची माहिती आहे. मात्र गुगल त्याही पुढे निघण्याच्या तयारीत आहे.

५ जीचाही वेग ओलांडणार ‘ही’ कंपनी, १०० जीबीपीएस ब्रॉडबँड स्पीड देण्याची योजना
प्रतिकात्मक छायाचित्र (pic credit – pixabay)

कालच भारतात ५ जी सेवेचा शुभारंभ झाला आहे. ५ जी ही ४ जी पेक्षा १० पट अधिक गतिमान असल्याचे सांगितले जाते. तसेच, ते २० जीबी पर्यंतची उच्चतम स्पिड देत असल्याची माहिती आहे. मात्र, गुगल त्याही पुढे निघण्याच्या तयारीत आहे. अहवालानुसार, गुगल १०० जीबीपीएस पर्यंतची इंटरनेट स्पिड देण्याची योजना आखत आहे.

झेड डी नेटनुसार, अल्फाबेटची गुगल फायबर ही आपल्या ब्रॉडबॅन्ड युजर्सना १०० जीबीपीएस पर्यंतची इंटरनेट सेवा देण्याची योजना आखत आहे. अमेरिकेतील इतर ब्रॉडबँड पुरवठादारांची सेवा गुगल इतकी वेगवान नाही. कंपनी सध्या १ जीबी पर्यंतचा प्लान देते. यासाठी ती महिन्याचे 5 हजार ७१४ रुपये घेते.

१०० जीबीपीएस स्पीड देण्याची योजना

गेल्यावर्षी कंपनीने ८ हजार रुपये महिन्याचा प्लॅन लाँच केला होता. यात कंपनीने २/1 जीबीपीएस डाऊनलोड/अपलोड सेवेसह १ टीबी क्लाऊड स्टोरेजचा समावेश होता. आता कंपनी यांहून अधिक १०० जीबीपीएस स्पीड देण्याची योजना बनवत आहे.

(5G in iphone : तुमच्या आयफोनमध्ये ५ जी आहे का? अ‍ॅपल यूजरना कोणत्या शहरात ५ जी सेवा मिळणार? जाणून घ्या सर्व प्रश्नांची उत्तरे)

इतकेच नव्हे तर गुगलने एक घोषणा केली आहे. आपण टेक्स्ट तू स्पीच वॉयस आणि साउंड अधिक चांगले करत असल्याची घोषणा गुगलने केली आहे. गुगल अँड्रॉइड अ‍ॅप्समध्ये अधिक चांगला आवाज आणण्याचा प्रयत्न गुगलकडून होत आहे. दरम्यान गुगल फायबर १०० जीबीपीएसची ब्रॉडबॅन्ड सेवा ही केवळ अमेरिकेतच सुरू होणार आहे. मात्र, भारतात गुगलने पय रोवले आहेत. त्यामुळे ही सेवा भारतासह इतर देशातही पुढील काळात पुरवली जाण्याची शक्यता आहे.

सध्या ५ जी बाबत लोकांमध्ये उत्सुक्ता

दरम्यान भारतात सध्या ५ जी बाबत लोकांमध्ये अधिक उत्सुक्ता आहे. काल ५ जी सेवेचा शुभारंभ झाल्यानंतर आता दूरसंचार कंपन्या ग्राहकांना ५ जी सेवा पुरवण्याच्या तयारीत आहे. सुरुवातील काही मोजक्याच मोठ्या शहरांमध्ये ही सेवा दिली जाणार आहे. त्यानंतर हळू हळू याचे विस्तार होणार आहे. भारतात रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडीया हे ५ जी सेवा पुरवणार आहेत.

(ऑनलाईन फसवणुकीला बळी पडला ‘हा’ अभिनेता, आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी हे करा)

जिओ टप्प्याटप्प्याने ही सेवा देणार आहे. पहिल्या टप्प्यात दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नई येथे दिवाळीपर्यंत ५ जी सेवा मिळेल. हळू हळू ही सेवा विस्तारणार असल्याचे जिओचे म्हणणे आहे. एअरटेलची ५ जी सेवा ही दिल्ली, मुंबई, वाराणसी आणि बंगळुरूसह ८ मोठा शहरांमध्ये उपलब्ध होईल. कंपनी ५ जी सेवा मार्च २०२४ पर्यत संपूर्ण देशात विस्तारेल.

दरम्यान आतापर्यंत कुठल्याही दूरसंचार सेवा कंपन्यांनी आपले ५ जी प्लॅन्स उघड केलेले नाहीत. ५ जी सेवेसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी पुरवठादार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत असल्याने त्यांना योग्य किंमतीत ५ जी सेवा सुरू करणे गरजेचे असणार आहे. ५ जी प्लॅन्स हे ४ जी पेक्षा महागच असण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
5G in iphone : तुमच्या आयफोनमध्ये ५ जी आहे का? अ‍ॅपल यूजरना कोणत्या शहरात ५ जी सेवा मिळणार? जाणून घ्या सर्व प्रश्नांची उत्तरे

संबंधित बातम्या

७ हजारांच्या आत मिळवा ‘हा’ ३२ इंच टीव्ही, अमेझॉनवर मिळत आहे मोठी सूट
ओप्पोचा स्वस्त 5G फोन झाला लाँच; ८ तास गेमिंग, ५० एमपी कॅमेरासह मिळत आहेत भन्नाट फीचर्स
Samsung Galaxy A53 आणि OnePlus Nord 2 पैकी कोणता चांगला असेल बजेट स्मार्टफोन? जाणून घ्या
UPI व्यवहारादरम्यान ट्रान्झॅक्शन फेल झालं? कसं कराल निराकरण? जाणून घ्या
तुमच्या फोनमधून हे १७ धोकादायक Apps ताबडतोब डिलीट करा, पूर्ण यादी पाहा

व्हिडिओ

ताज्या बातम्या
रेल्वेमुळे तुळजापूर, उस्मानाबादच्या विकासाचा मार्ग मोकळा
स्मृतिभ्रंश आजार बरा करणारे औषध शोधण्यात यश ; वृद्धांना मोठा दिलासा
आरोग्य वार्ता : ‘फ्लू’ची लस हृदयरुग्णांसाठी लाभदायी
FIFA World Cup 2022 : अर्जेटिनाची पोलंडवर मात; दोन्ही संघ बाद फेरीत
FIFA World Cup 2022 : गोलफरकामुळे मेक्सिकोचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात