इलेक्ट्रिक दुचाकी निर्माता कंपनी जीटी फोर्सने भारतीय बाजारात दोन किफायशीर इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केल्या आहेत. या दोन लो-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटरची नावे ‘जीटी सोल वेगास’ आणि ‘जीटी ड्राईव्ह प्रो’ अशी आहेत. जाणून घ्या कोणते असतील खास फिचर्स…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जीटी सोल वेगास इलेक्ट्रिक स्कूटर

जीटी सोल वेगास इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये ६०V २८Ah लेड-अ‍ॅसिड बॅटरी मिळते. फुल चार्जमध्ये ही ६० किलोमीटरची रेंज देते. तसेच या इलेक्ट्रिक स्कूटरचा 60V 26Ah लिथियम-आयन बॅटरी व्हेरिएंट फुल चार्जमध्ये 65 किलोमीटरपर्यंत चालेल. कंपनीच्या दाव्यानुसार, लेड-अ‍ॅसिड बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यास जवळपास 8 तासांचा वेळ लागेल, तर लिथियम-आयन बॅटरी पॅकची चार्जिंग लवकरच म्हणजे पाच तासांमध्ये फुल चार्ज होईल.

जीटी सोल वेगासचे वजन ९५ किलो (लीड-ऍसिड) आणि ८८ किलो (लिथियम-आयन) आहे. त्याची उचलण्याची क्षमता १५० किलो आणि ग्राउंड क्लीयरन्स १७० मिमी आहे. स्कूटरला अँटी थेफ्ट अलार्म, रिव्हर्स मोड, क्रूझ कंट्रोल सिस्टीम, इग्निशन लॉक स्टार्ट, टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेंशन आणि ड्युअल ट्यूब रिअर सस्पेंशन मिळते. हे तीन बाह्य रंगांमध्ये सादर केले जाईल – ग्लॉसी रेड, ग्रे आणि ऑरेंज.

आणखी वाचा : महिंद्राच्या ‘या’ कारवर बंपर ऑफर, पण ग्राहक फिरकेना! आकडेवारी ऐकून व्हाल दंग…

जीटी ड्राईव्ह प्रो इलेक्ट्रिक स्कूटर

जीटी ड्राईव्ह प्रो इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल बोलायचं झालं तर या ई-स्कूटर मध्ये ४८V २८Ah लेड-अ‍ॅसिड बॅटरी किंवा ४८V २६Ah लिथियम-आयन पॅक मिळतो, जो जीटी सोल वेगास इतकीच रेंज देतो. दोन्ही स्कूटर्सचा चार्जिंग टाइम सारखाच आहे. जीटी ड्राईव्ह प्रो मध्ये जीटी सोल वेगास सारखे फीचर्स आहेत परंतु तरीही हिचे वजन १० किलोग्रॅम कमी अर्थात ८५ किलोग्राम आहे.

जीटी ड्राइव्ह प्रो चार बाह्य रंगांमध्ये उपलब्ध आहे ज्यात पांढरा, निळा, लाल आणि चॉकलेटचा समावेश आहे. कंपनी मोटरवर १८ महिन्यांची वॉरंटी, लीड-ऍसिड बॅटरीसाठी एक वर्षाची वॉरंटी आणि स्कूटरच्या दोन्ही मॉडेल्ससाठी लिथियम-आयन पॅकवर तीन वर्षांची वॉरंटी देते.

 किंमत

जीटी सोल वेगास आणि जीटी ड्राइव्ह प्रो या नावाने सादर करण्यात आल्या आहेत. त्यांची किंमत अनुक्रमे ४७,३७० रुपये आणि ६७,२०८ रुपये आहे. या स्कूटर एकतर लीड-ऍसिड बॅटरी किंवा लिथियम-आयन पॅकसह उपलब्ध आहेत. दोन्ही स्कूटर कमी अंतराच्या प्रवासासाठी डिझाइन केल्या आहेत.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gt force has launched two affordable electric scooters in the indian market pdb
First published on: 30-09-2022 at 18:28 IST