होळीचा सण रंग, उत्साहाने भरलेला असतो. ज्यामध्ये रंगीबेरंगी पिचकारीसह अबीर-गुलालाची होळी खेळली जाते. या दिवशी वाटेवरून चालतानाही लोक एकमेकांना रंगात भिजवतात. अशा परिस्थितीत जर तुमच्याकडे स्मार्टफोन आणि हेडफोनसारखे कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण असेल तर पाण्याच्या संपर्कात आल्याने खराब होऊ शकतात. या होळीमध्ये तुमचे स्मार्टफोन आणि वेअरेबल सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही या काही टिप्स फॉलो करू शकता.

वाटरप्रूफ पाउच
पावसाळ्यात लोक त्यांचे फोन सुरक्षित ठेवण्यासाठी वापरतात ते छोटे वॉटरप्रूफ प्लास्टिक पाऊच खूप स्वस्त आहेत आणि होळीच्या वेळी तुमचा फोन बाहेर सुरक्षित ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग असू शकतो. तुम्ही हे ऑनलाइन किंवा तुमच्या स्थानिक मोबाइल स्टोअरमधून खरेदी करू शकता.

f you're watching your blood sugar levels, you might want to keep an eye on how much bread you're pairing with your eggs
अंडे ब्रेडबरोबर खावे की ब्रेडशिवाय? रक्तातील साखर वाढू नये म्हणून अंडे कसे खावे? जाणून घ्या अंडी खाण्याचा उत्तम मार्ग
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
cholesterol levels
‘हा’ एक ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल झपाट्याने होईल कमी; फक्त सेवनाची पद्धत एकदा डाॅक्टरांकडून जाणून घ्या
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो

स्क्रीन प्रोटेक्टर आणि कॅमेरा लेन्स प्रोटेक्टर
जर तुम्हाला तुमच्या फोनचे सौंदर्य आणि कॅमेरा क्वालिटी जपायची असेल तर तुम्हाला ते बाहेरूनही संरक्षित करावे लागेल. स्वस्त पारदर्शक TPU (स्क्रीन गार्ड) जो फोनभोवती गुंडाळतो. यामुळे तुमच्या डिव्हाइसवरील रंगांवर परिणाम होणार नाही आणि तुम्ही होळी खेळल्यानंतर ते काढू शकता. याशिवाय, अधिक संरक्षणासाठी तुम्ही लेन्स प्रोटेक्टर जोडू शकता.

तुमच्या फोनची साफसफाई
सावधगिरी बाळगूनही तुमचा स्मार्टफोन रंगत असेल तर तो साफ करताना काळजी घ्यावी लागेल. तुमच्या फोनमध्ये योग्य IP प्रमाणपत्र असल्यास आणि ते वॉटरप्रूफ असल्यास, तुम्ही फक्त एक किंवा दोन स्प्लॅश देऊ शकता आणि कापडाने रंग पुसून टाकू शकता. तसं नसल्यास, मागील पॅनेलच्या कडा आणि स्पीकर ग्रिल किंवा मायक्रोफोन सारखी ठिकाणे वगळून तुमचा फोन ओल्या कापडाने पुसून टाका.

आणखी वाचा : बूटने लॉंच केलं Wave Pro 47 स्मार्ट वॉच, SpO2 मॉनिटर आणि लाइव्ह क्रिकेट स्कोअर सारखे फिचर्स

डस्ट प्लग
तुम्ही यूएसबी-सी पोर्ट आणि ३.५ मिमी पोर्टसाठी डस्ट प्लग ऑनलाइन सहज शोधू शकता आणि होळीच्या दिवशी तुमचा फोन सुरक्षित करण्याचा हा एक उत्तम मार्ग असू शकतो.

इअरबड्स
तुम्हाला तुमचे इअरबड्स सोबत घेऊन जायचे असल्यास, ते बॉक्स किंवा प्लास्टिकच्या पिशवीत ठेवण्याचा विचार करा. बॉक्स शक्यतो पाण्यापासून दूर ठेवा. तसेच, होळी साजरी करताना इअरबड्स हरवण्याची शक्यता खूप जास्त आहे, म्हणून ते घरीच सोडण्याचा सल्ला देतो.

आणखी वाचा : रेडमी हायपर चार्जर स्मार्टफोनला टक्कर देण्यासाठी येतोय Realme GT Neo 3, फक्त ५ मिनिटांत ५० टक्के बॅटरी चार्ज

स्मार्ट वॉच
स्मार्टवॉच जर तुम्हाला होळीच्या वेळी जास्त काळजी घ्यायची असेल, तर लोकप्रिय स्मार्टवॉच स्क्रीन प्रोटेक्टरसह देखील येतं, जे पाण्यापासून संरक्षण देऊ शकतं.