Honor कंपनीने भारतात आपला Honor 90 5G हा नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Honor च्या या नवीन स्मार्टफोनमध्ये Qualcomm स्नॅपड्रॅगन 7 Gen 1 SoC चा सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच यात वापरकर्त्यांना ५००० mAh क्षमतेची बॅटरी आणि ६६ W वायर्ड सुपरचार्ज टेक्नॉलॉजी मिळणार आहे. हा फोन कंपनीने तीन रंगांमध्ये लॉन्च केला आहे. ऑनरच्या या नवीन स्मार्टफोनची विक्री आजपासून भारतात सुरु झाली आहे. या जबरदस्त स्मार्टफोनचा सेल आज दुपारी १२ वाजल्यापासून Amazon वर सुरु झाला आहे. तसेच हा फोन खरेदी करताना कंपनी अनेक ऑफर्स देखील देत आहे. ३ वर्षांनंतर दीर्घ कालावधीनंतर ऑनर ९० या स्मार्टफोनकसह कंपनी भारतात सक्रिय झाली आहे. हा फोन वनप्लस, नथिंग फोन , सॅमसंग आणि अन्य स्मार्टफोनशी स्पर्धा करेल. honor च्या या नवीन फोनमध्ये वापरकर्त्यांना ६.७ इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळणार आहे. याचे रिझोल्युशन हे १.५ के इतके आहे. तर याचा रिफ्रेश रेट हा १२० Hz इतका आहे. या फोनला Qualcomm स्नॅपड्रॅगन 7 Gen 1 SoC सपोर्ट येतो. ज्यात १२८ जीबी LPDDR5 रॅम आणि २५६ जीबी इतके UFS 3.1 इनबिल्ट स्टोरेजसह जोडण्यात आपले आहे. हा फोन अँड्रॉइड १३ आधारित OS ७.१ वर चालतो. हेही वाचा : फोटोग्राफर्ससाठी खुशखबर! २०० मेगापिक्सलच्या जबरदस्त कॅमेऱ्यासह Honor चा ‘हा’ स्मार्टफोन भारतात लॉन्च तसेच honor ९० ५जी स्मार्टफोनमध्ये २०० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळणार आहे. तसेच अल्ट्रा वाइड अँगलसह १२ मेगापिक्सलचा सेन्सर आणि LED फ्लॅश युनिटसह २ मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स देखील या सेटअपमध्ये मिळते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ५० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा वापरकर्त्यांना मिळणार आहे. या फोनमध्ये वापरकर्त्यांना ५००० mAh क्षमतेची बॅटरी मिळणार आहे. यासाठी यामध्ये ६६W चा चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. सुरक्षेसाठी यात फोन फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. तसेच कनेक्टिव्हिटीसाठी 5G, 4G LTE, ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.2, NFC, GPS आणि USB टाइप-सी अशी फीचर्स यात मिळतात. Honor 90 5G : किंमत आणि ऑफर्स ऑनर ९० ५जी या फोनची विक्री आज दुपारी १२ वाजल्यापासून सुरु झाली आहे. Amazon वॉर हा फोन खरेदी करत असताना खरेदीदारांना अनेक ऑफर्स देखील मिळणार आहेत. कंपनीने Honor 90 हा फोन दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लॉन्च केला आहे. त्यामधील ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ३७,९९९ रुपये आहे. तर २ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ३९,९९९ रुपये इतकी आहे. ICICI आणि SBI कार्ड असणार्या खरेदीदारांना Amazon ३ हजारांचा झटपट बँक डिस्काउंट ऑफर करत आहे. खरेदी, डेबिट कार्ड आणि ईएमआय व्यवहारांवर देखील ही ऑफर उपलब्ध असणार आहे. जुन्या स्मार्टफोनवर कंपनी एक्सचेंज बोनस देखील देत आहे. कंपनी ५ हजारांचे लॉन्च डिस्काउंट कूपन पण देत आहे. ज्यामुळे या फोनची किंमत ३०,००० रुपयांपेक्षा कमी होऊ शकते.