गेल्या काही दिवसांपासून Honor च्या एका स्मार्टफोनची सर्वत्र चर्चा रंगली होती, तो अखेर भारतीय बाजारपेठेत लाँच झाला आहे. तर या स्मार्टफोनचे नाव ‘ऑनर एक्स९बी’ ( Honor X9b) असे आहे. Honor 90 नंतर कंपनीचा हा भारतातील दुसरा टिकाऊ स्मार्टफोन असणार आहे. तर या स्मार्टफोनचे फीचर्स आणि किंमत जाणून घेऊ.

फीचर्स आणि ग्राहकांसाठी खास ऑफर्स :

उच्च रिझोल्यूशन स्मार्टफोनमध्ये १०८ मेगापिक्सेल कॅमेरा आणि ५,८०० एमएएच बॅटरीचा समावेश आहे. तसेच यामध्ये अल्ट्रा-बाउन्स “अँटी-ड्रॉप” डिस्प्ले आहे ; जो शॉक ॲबसॉरब (Shock Absorbing) सामग्रीसह उपलब्ध आहे. Honor X9b मध्ये १.५के रिझोल्यूशनसह ६.७८ इंच १२०एचझेड वक्र AMOLED डिस्प्ले आहे आणि १,२०० युनिट्सपर्यंत पीक ब्राइटनेस आहे. तसेच ८जीबी LPDDR4X रॅम आणि २५६ जीबी UFS3.1 स्टोरेजसह Qualcomm Snapdragon 6 Gen 1 ने सुसज्ज आहे, तर स्मार्टफोनमध्ये ३५डब्ल्यू फास्ट चार्जिंगसाठी ५,८०० एमएएच बॅटरी आहे (कंपनीकडून ग्राहकांसाठी ऑफर म्हणून ६९९ रुपये किमतीचा मोफत ३०डब्ल्यू चार्जर देण्यात येणार आहे ).

हेही वाचा…मोफत जेवण, झोपण्याची सोय… मायक्रोसॉफ्ट ऑफिसचा ‘हा’ VIDEO पाहून नेटकरी विचारतायत अर्ज कसा करू?

कॅमेरा :

फोटोग्राफीसाठी Honor X9b मध्ये १०८एमपी मुख्य कॅमेरा, तर बॅक कॅमेरामध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, जो ८एमपी अल्ट्रावाइड आणि २एमपी मॅक्रो कॅमेराबरोबर जोडण्यात आलेला आहे. तसेच यामध्ये १६एमपी सेल्फी कॅमेरा आहे.

तसेच या फोनची खास गोष्ट अशी की, SGS स्वित्झर्लंडने ड्रॉप रेझिस्टन्ससाठी या फोनला ५ स्टार रेटिंगने प्रमाणित केलं आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन ३६० डिग्री म्हणजेच फोनच्या सर्व सहा फेस (Faces) आणि चार कॉर्नर्सना संरक्षण देतो. त्यामुळे हा फोन कोणत्याही संगमरवरी दगडावर पडला तरीही कोणतेही नुकसान होणार नाही. असे कंपनीकडून सांगण्यात येत आहे. कंपनीने “Honor Protect” ही डिव्हाइस केअर योजनेन ‘वन साइट गो’बरोबर पार्टनरशिप करून मोबाइल संरक्षण योजनादेखील जाहीर केली आहे, ज्यामध्ये ग्राहकांना Honor X9b साठी २,९९९ रुपयांमध्ये सहा महिन्यांत एकदा स्क्रीन रिप्लेसमेंट करता येईल.

‘ऑनर एक्स९बी’ची भारतातील किंमत आणि ग्राहकांसाठी डिस्काउंट :

Honor X9b स्मार्टफोन ८जीबी, २५६ जीबी व्हेरिएंटची भारतातील किंमत २५,९९९ रुपये आहे, तर ॲमेझॉनवर आजपासून दुपारी १२ नंतर हा फोन सर्व ग्राहकांसाठी उपलब्ध असेल. ICICI बँकच्या ग्राहकांना त्यांच्या बँक कार्डच्या मदतीने ३००० रुपयांपर्यंत इन्स्टंट डिस्काउंट मिळणार आहे. याव्यतिरिक्त सेलच्या पहिल्या दिवशी ५,००० रुपयांचा एक्स्चेंज बोनस दिला जाईल.